लातूर स्क्रॅप मार्केट आग

स्क्रॅप मार्केटमधील आगीचे कारण अस्पष्ट!

Latur scrap market fire: लातूर शहरातील मंठाळे नगर भागातील गोरक्षण जवळ स्क्रॅप मार्केटमध्ये सोमवारी लागलेल्या आगीमध्ये तीन दुकाने जळून खाक झाली. या आगीत अन्गल हार्डवेअर, पेंट्स, संपूर्ण पत्रा शेड

स्क्रॅप मार्केटमधील आगीचे कारण अस्पष्ट!

Latur scrap market fire

 

लातूर महापालिका, औसा, रेणापूर व विलास कारखान्याच्या पथकांनी मिळविले आगीवर नियंत्रण

लातूर (Latur scrap market fire) : लातूर शहरातील मंठाळे नगर भागातील गोरक्षण जवळ स्क्रॅप मार्केटमध्ये सोमवारी लागलेल्या आगीमध्ये तीन दुकाने जळून खाक झाली. या आगीत अन्गल हार्डवेअर, पेंट्स, संपूर्ण पत्रा शेड, प्लास्टिक ताडपत्री, पीपी रोप, प्लंबिंग साहित्य, कॉस्मेटिक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. दरम्यान, या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही, असे लातूर महापालिका (Latur Municipal Corporation) अग्निशामक दलाचे प्रमुख गणेश चौधरी यांनी सांगितले.

सोमवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही (Latur scrap market fire) आग लागली. याबाबत नगरसेवक राजू आवस्कर यांनी लातूर महापालिका (Latur Municipal Corporation) अग्निशामक विभागाला दुपारी १३.५४ वाजता कळविल्यानंतर अग्निशामक दलाने तात्काळ (१३.५५ वाजता) प्रथम अग्निशमन वाहन रवाना केले. मात्र घटनास्थळी आगीचे रौद्ररूप लक्षात घेता अग्निशामक दलाच्या आणखी वाहनांची गरज भासल्याने लातूर महानगरपालिका (Latur Municipal Corporation) अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. तसेच औसा नगरपरिषद, रेणापूर नगर पंचायत व विलास साखर कारखाना येथील अग्निशामक दलाच्या पथकांनाही आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले.

या (Latur scrap market fire) आगीवर लातूर शहर महानगरपालिकेचे (Latur Municipal Corporation) एकूण ७ अग्निशमन वाहने व ३५ ते ४० जवान तसेच औसा नगरपरिषद, रेणापूर नगर पंचायत व विलास साखर कारखाना या पथकांच्या मदतीने तब्बल ४ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यास यश आले. असे असले तरी तब्बल एकूण कुलिंगसह आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी १२ ते १३ तास लागले. सदर ठिकणी १ अग्निशमन वाहन रात्रभर कुलिंग साठी ठेवण्यात आले होते. 

यांनी केले शर्थीचे प्रयत्न...
आग विझविण्यासाठी (Latur scrap market fire) लातूर महानगरपालिकेचे (Latur Municipal Corporation) मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी बापुसाहेब जाधव लीडिंग फायरमन आनंद शिंदे, रोहित बनकर, अविनाश कराडे, ओंकार मानकर, फायरमन सर्वश्री गिरीश वानखेडे, पल्लवी पवार, साईनाथ मिसाळ, सतीश खटाळ, मोहन महले, मनिषा गवळी, राहुल भोये, बाळासाहेब जाधव, ओम कुमठेकर, प्रवीण खरसे, अमोल वाघमोडे, वैभव अवरगंड, हसन शेख, सोमेश नवगिरे, बाळासाहेब पवार, रोहित सुरजुसे, जानी शेख, काशिनाथ म्हाके, निलेश आचार्य, प्रशांत शिंदे, यंत्रचालक सर्वस्वी निलेश बुरपल्ले, विकास इंगोले, मुकुंदा देशमुख, सचिन राठोड, संदेश वाढवणे, आकाश पवार, डीईओ विशाल घुले अमर शेख व इतर कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

टैग्स: Latur scrap market fire