लातूर हेल्मेट सक्ती

हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

Latur Helmet Rule Mandatory: गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाती मृत्यूच्या आकडेवारीतून लातूर पोलिसांच्या हेल्मेट सक्तीचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. ऑगस्ट मधील ३३ अपघाती मृत्यू

हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

Latur Helmet Rule Mandatory

 

जिल्हा पोलीस प्रशासन; जाहीर केली आकडेवारी

लातूर (Latur Helmet Rule Mandatory) : गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाती मृत्यूच्या आकडेवारीतून लातूर पोलिसांच्या हेल्मेट सक्तीचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. ऑगस्ट २०२६ मधील ३३ अपघाती मृत्यूंच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये १३ मृत्यू झाले असून २० जीव वाचल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. दरम्यान २२ हजार ९०७ विना हेल्मेट वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ सप्टेंबर २०२६ पासून राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर (Latur Helmet Rule Mandatory) हेल्मेट सक्तीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. हेल्मेट वापराबाबत जनजागृतीसोबतच कायदेशीर कारवाई अशा दोन्ही पातळ्यांवर राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला एक महिना पूर्ण झाला असून, या कालावधीतील अपघाती मृत्यूंच्या आकडेवारीत झालेली घट हेल्मेट वापराचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरत आहे.

लातूर जिल्ह्यात वाढते अपघात आणि त्यामध्ये विशेषतः दुचाकीस्वारांचा होणारा मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा नियमित वापर करावा, यासाठी लातूर पोलीस विभागाने मार्च २०२६ पासूनच विविध माध्यमांतून जनजागृती सुरू केली होती. मात्र, सातत्याने जनजागृती करूनही (Latur Helmet Rule Mandatory) हेल्मेट वापराबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने १ सप्टेंबर २०२६ पासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यातून महिनाभरात २२ हजार ९०७ विना हेल्मेट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे, नागरिकांना केवळ दंड करणे हा पोलिसांचा उद्देश नसून हेल्मेट वापरण्याची सवय लागावी आणि भविष्यातील अपघातांमध्ये जीवितहानी टाळता यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. ज्या ठिकाणी हेल्मेट वापराबाबत कारवाई करण्यात येत होती, त्या ठिकाणी नागरिकांना तत्काळ हेल्मेट खरेदी करता यावे यासाठी (Latur Helmet Rule Mandatory) हेल्मेट विक्रीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. नागरिकांनी हेल्मेट खरेदी करून त्याचा वापर केला, तर त्यांना दंडात्मक कारवाईपासून दिलासा देण्यात आला. यातूनही कारवाईपेक्षा हेल्मेट वापराला प्राधान्य असल्याचा संदेश लातूर पोलिसांनी दिला. तसेच मागील वर्षाच्या तुलनेतही ही घट स्पष्टपणे दिसून येते. सप्टेंबर २०२५ मध्ये अपघातांमध्ये २३ व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर सप्टेंबर २०२६ मध्ये ही संख्या १३ झाली आहे.

‘कायद्याच्या भीतीपेक्षा कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करा’!

लातूर पोलिसांच्या (Latur Helmet Rule Mandatory) हेल्मेट सक्तीमागे दंड वसूल करणे किंवा नागरिकांना त्रास देणे हा उद्देश नसून अपघातातील जीवितहानी कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनीही या उपक्रमाकडे केवळ ‘हेल्मेट सक्ती’ म्हणून न पाहता ‘कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठीचे अभियान’ म्हणून पाहण्याची गरज आहे.  हेल्मेट हा पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी नव्हे, तर आपला जीव वाचवण्यासाठी वापरा. स्वतः हेल्मेट वापरा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक दुचाकीस्वारालाही हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.