Lakhan Singh

भाजपचे लखनसिंह ठाकूर यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पांदण रस्ता योजनेची मोठी जबाबदारी

लखनसिंह ठाकूर हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

भाजपचे लखनसिंह ठाकूर यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पांदण रस्ता योजनेची मोठी जबाबदारी

Lakhan Singh

रिसोड ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ता योजना' अंतर्गत रिसोड विधानसभा क्षेत्राच्या सह-अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ व सक्रिय नेते लखनसिंह ठाकूर यांची अधिकृत वर्णी लागली आहे. शासनाकडून जाहीर झालेल्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे रिसोड आणि मालेगाव तालुक्यासह संपूर्ण वाशीम जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संघाचे संस्कार अन् भाजपशी एकनिष्ठतेची पावती

लखनसिंह ठाकूर हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. भारतीय जनता पार्टीचे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आणि पक्षाच्या पडत्या काळातही सामाजिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे. त्यांच्या याच दांडग्या जनसंपर्काची, संघटन कौशल्याची आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेची पावती म्हणून शासनाने त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे.

'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ता योजना' ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सर्व ऋतूंमध्ये, विशेषतः पावसाळ्यात, विनाअडथळा पोहोचण्यासाठी पक्के रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविली जात आहे. लखनसिंह ठाकूर यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निश्चितच होईल. तालुक्यात पांदण रस्त्यांचे जाळे मजबूत झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल, कृषी कामांना गती मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार आहे.

आपल्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीनंतर लखनसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या राज्यातील व जिल्ह्यातील वरिष्ठ नेतृत्वाचे जाहीर आभार मानले आहेत.

"शासनाच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची रिसोड विधानसभा क्षेत्रात तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि बळीराजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. क्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल," असा विश्वास लखनसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.

ठाकूर यांच्या या राजकीय पदोन्नतीमुळे रिसोड विधानसभा क्षेत्रात भाजप संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल, अशी राजकीय चर्चा सध्या रंगू लागली आहे.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026