कोटगूल आदिवासी संस्था

840 जणांचे ऑनलाईन होते, वनपट्टेधारकांचे का नाही?

Kotgul tribal organization: खरीप हंगाम 2025-26 मध्ये आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कोटगूल (र.नं. 715) ने वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वगळल्याचा प्रकार

840 जणांचे ऑनलाईन होते, वनपट्टेधारकांचे का नाही?

Kotgul tribal organization

 

कोटगूल संस्थेचा आदिवासी विरोधी चेहरा उघड, विभागीय चौकशीची मागणी 

कोटगूल/कोरची/ गडचिरोली (Kotgul tribal organization) : खरीप हंगाम 2025-26 मध्ये आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कोटगूल (र.नं. 715) ने वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वगळल्याचा आणि सहकार विभागाने हात झटकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या सर्व माहितीचे सविस्तर पत्र माजी आमदार माननीय कृष्णाजी गजबे साहेब यांना देण्यात आले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची उच्चस्तरीय विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

संस्थेच्या स्वतःच्या पत्रातच कबुली आहे - 840 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी, 659 शेतकऱ्यांची खरेदी आणि 150 शेतकरी बाकी म्हणून दि. 27/02/2026 रोजी मुदतवाढीची मागणी. मग 840 जणांचे होते तर वनपट्टेधारकांचे का नाही? हातात वैध वनपट्टा आणि 7/12 घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना "शासनाचे आदेश नाही" असे सांगून परत पाठवण्यात आले. वास्तविक शासन निर्णय दि. 04/11/2025 नुसार वनपट्टेधारकांना अडचण होऊ नये म्हणून माहिती मागवण्याचे आदेश होते. म्हणजे शासनाने नाकारले नव्हते, तर व्यवस्थापनानेच शासनाच्या नावाने खोटे सांगितले.

तसेच सहाय्यक निबंधक हेमंत सोलांखे यांनी परिच्छेद 5.4.4.10 व 5.8.1 चा दाखला देत संपूर्ण जबाबदारी आदिवासी विकास महामंडळ, कोरचीवर ढकलली आहे. ही सर्व कागदपत्रे आणि पुरावे माजी आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. या अन्यायाविरोधात माजी आमदार माननीय कृष्णाजी गजबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा तालुका कोरची आक्रमक झाले आहे.

युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद फगणीबाई भारत कोरेटी म्हणाले, "आम्ही या सर्व अन्यायाची माहिती आमचे नेते माजी आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांना दिली आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या लढ्याला न्याय मिळवून देऊ. या प्रकरणाची विभागीय चौकशी झालीच पाहिजे." भाजपा तालुकाध्यक्ष सदाराम सुन्हेर नुरुटी म्हणाले, "माजी आमदार कृष्णाजी गजबे साहेब नेहमीच आदिवासी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे दिली असून,जर दोषींवर कारवाई झाली नाही, तर भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा तालुका कोरची रस्त्यावर उतरेल."

- मार्गदर्शक : माननीय माजी आमदार कृष्णाजी गजबे साहेब
- विनोद फगणीबाई भारत कोरेटी, तालुकाध्यक्ष - भारतीय जनता युवा मोर्चा, कोरची
- सदाराम सुन्हेर नुरुटी, तालुकाध्यक्ष - भाजपा, तालुका कोरची