कॉटगुल अवैध धंद्या

कोटगुलमध्ये नवी पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र?

Kotgul illegal business: एका बाजूने कोटगुल परिसरातील युवक आदिवासी विभागात उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून लागत आहेत, तर दुसऱ्या बाजूने याच परिसरातील युवकांना अवैध धंद्यात

कोटगुलमध्ये नवी पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र?

Kotgul illegal business

 

बाहेरच्या लोकांकडून युवकांना अवैध धंद्यात ओढले जात असल्याचा आरोप; युवा मोर्चा आक्रमक 

कोटगुल/ कोरची/ गडचिरोली (Kotgul illegal business) : एका बाजूने कोटगुल परिसरातील युवक आदिवासी विभागात उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून लागत आहेत, तर दुसऱ्या बाजूने याच परिसरातील युवकांना अवैध धंद्यात लावून नवी पिढीला बरबाद करण्याचे षडयंत्र काही बाहेर आलेले लोक करत आहेत असे दिसत आहे, अशी खळबळजनक तोंडी तक्रार नागरिक करत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे कोरची तालुकाध्यक्ष विनोद फगणीबाई भारत कोरेटी यांनी केला आहे.

याबाबत बोलताना कोरेटी म्हणाले, "कोटगुल परिसरातील नागरिक, महिला व शेतकरी माझ्याकडे तोंडी तक्रार करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कोटगुल परिसर म्हणजे काय असा प्रश्न पडला आहे."

नागरिक तोंडी तक्रार करत आहेत की, कोटगुल परिसर म्हणजे:

१. गाय तस्करीचा मुख्य अड्डा...
२. कॅसिनोचा अड्डा...
३. अवैध देशी-विदेशी दारू साठा व विक्रीचा अड्डा...
४. पिस्तूल आणि कट्टा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बाळगतात...
५. शेतकऱ्यांना, मुख्यतः वनपट्टेधारक शेतकऱ्यांना हेक्टरी बोनसपासून वंचित ठेवण्याचा अड्डा...

कोरेटी पुढे म्हणाले, "हे सर्व धंदे कोणी सुरू केले? मग असे लोकांना कोटगुल परिसर का म्हणून सहन करावा? कोटगुल परिसरातील सामाजिक दायित्व काही नाही का? ज्या गावातील युवक शिक्षक बनत आहेत, त्याच गावातील युवकांना दारू, जुगार आणि इतर अवैध धंद्यात ओढणे कितपत योग्य आहे?"

शेतकऱ्यांचा गंभीर मुद्दा:
यातील सर्वात गंभीर मुद्दा शेतकऱ्यांचा आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील व्यवस्थापकांनी वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे ऑनलाईन केले नाही, त्यामुळे शेतकरी हेक्टरी बोनसपासून वंचित राहणार आहेत, अशी शेतकरी तोंडी तक्रार करत आहेत.

"व्यवस्थापक जरी शासकीय कर्मचारी नसला आणि संचालक मंडळ कारवाई करत नसेल, तर संबंधित कार्यालयाने म्हणजेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली यांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. जे आपल्या पदाची जबाबदारी पार पाडत नाहीत, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी," अशी मागणी कोरेटी यांनी केली आहे.

हा (Kotgul illegal business) संपूर्ण विषय आपण पुराव्यांसह माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

परभणीत नशेसाठी वापरण्यात येणारा सिरपचा साठा जप्त...!

परभणीत नशेसाठी वापरण्यात येणारा सिरपचा साठा जप्त...!

Parbhani syrup stock seized: परभणीतच्या खंडोबा बाजारात रात्रगत पोलिस पथकाने अवैध नशेसाठीच्या वाहतूकाची माहिती मिळवून २ लाख ३० हजार रु.चा साठा जप्त केला.

Jul 02, 2026
उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर रसाळ ठरले ‘सिंघम’

उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर रसाळ ठरले ‘सिंघम’

Police Officer Mayur Rasal: उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर रसाळ व डॉ. नीलाभ रोहण यांच्या नेतृत्वाने हिंगोलीत 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये ८ ठिकाणी छापे मारून धंड्यांवर पडली. गुटखा, अवैध दारू, मटका

Jun 16, 2026