कावड यात्रा मृत्यू

कावड यात्रेदरम्यान एका भाविकाचा मृत्यू

Kanwar Yatra Death: विदर्भातील कावड यात्रा श्रीक्षेत्र  औंढा नागनाथाचे दर्शन करून शनिवार  रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोलीकडे येत असताना डिग्रस कर्‍हाळे  पाटीजवळ दोन कावडचे वाहन मागेपुढे..

कावड यात्रेदरम्यान एका भाविकाचा मृत्यू

Kanwar Yatra Death

हिंगोली (Kanwar Yatra Death) : विदर्भातील कावड यात्रा श्रीक्षेत्र  औंढा नागनाथाचे दर्शन करून शनिवार  रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोलीकडे येत असताना डिग्रस कर्‍हाळे  पाटीजवळ दोन कावडचे वाहन मागेपुढे घेत असताना बसलेल्या धडकेत सोमनाथ भानावत (१९) हा भाविक अडकून त्याचा  दुर्देवी  मृत्यू झाला.

या  बाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या श्रावण मासारंभ  सुरु आहे. त्यानिमित्ताने विदर्भातून मोठ्या प्रमाणात कावड श्रीक्षेत्र औंढा नागनाथाच्या दर्शनाकरीता येत आहेत. २२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या  सुमारास वाशिम  जिल्ह्यातील डव्हा येथील कावड परतीच्या मार्गावर येत होती. डिग्रस कर्‍हाळे  पाटीजवळ दोन कावडच्या डिजेचा आवाज दणदणाट  होता. यावेळी डिजेच्या वाहनचालकाने वाहन मागे घेतल्याने पाठीमागे असलेल्या दुसर्‍या डिजेच्या वाहनाला धडक बसली.

यावेळी दोन वाहनाच्या मध्ये सोमनाथ भानावत हा अडकून गंभीररित्या जखमी (Kanwar Yatra Death) झाला. त्याला तात्काळ  हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. रविवार  २३ ऑगस्टला शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात  मयताचे शवविच्छेदन  करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. घटनास्थळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक  विष्णुकांत गुठ्ठे, सुधीर ढेंबरे, अस्लम गारवे, सलीम पठाण यांनी भेट दिली. या  अपघाताबाबत रविवारी रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026