हिंगोली (Tobacco-Gutkha Raid) : शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू आणि गुटखा खाणार्यांवर आता थेट कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने हिंगोली जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत असून कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणार्या तसेच ते सोबत बाळगणार्या कर्मचार्यांवर कोटपा २००३ च्या कलम ४ नुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे.
या मोहिमेचा पहिला फटका ९ जुलै रोजी पंचायत समिती हिंगोलीच्या कार्यालयाला बसला. येथे तपासणी दरम्यान १४ कर्मचार्यांकडून तंबाखूचे सेवन केल्याचे आढळून आले आणि त्यांच्याकडून २८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांमध्ये केलेल्या तपासणीत कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थ खाणार्या आणि ते जवळ बाळगणार्या ३ कर्मचार्यांकडून ६० रुपये दंड घेण्यात आला. १३ जुलै रोजी मोहिमेचा विस्तार करत पोस्ट ऑफीस, रजिस्ट्री कार्यालय, एल.आय.सी. कार्यालय आणि हिंगोली रेल्वे स्टेशन येथे अचानक तपासणी करण्यात आली.
यावेळी १८ जण तंबाखू-गुटखा खाताना किंवा जवळ बाळगताना आढळले आणि त्यांच्याकडून २२५० रुपये दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही सुरू करण्यात आली असून यापुढेही जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातर्फे सर्व शासकीय कर्मचार्यांना आवाहन करण्यात आले आहे की कर्तव्याच्या वेळी तंबाखू, गुटखा सारखे पदार्थ खाऊ नयेत.
तसेच कामानिमित्त कार्यालयात येणार्या नागरिकांनीही कार्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये किंवा ते सोबत आणू नयेत. आरोग्यदायी आणि स्वच्छ कार्यालयीन वातावरण राखण्यासाठी ही मोहीम जिल्हाभर राबवली जाणार आहे. ही संपूर्ण कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्यासोबत मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर आणि मेडिकल सोशल वर्कर आनंद साळवे हे देखील उपस्थित होते.
तंबाखू-गुटखा धडक मोहिम
शासकीय कार्यालयात तंबाखू-गुटख्याला कडक चाप; तीन दिवसांत ५६५० रुपयांचा दंड वसूल
Tobacco-Gutkha Raid: हिंगोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू, गुटखा इत्यादी कुरण्यावर कटकपट्ट्या करताना १४० कर्मचार्यांवर ५६५० रुपये दंड वसूल करण्याची धडक मोहिम सुरू
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Tobacco-Gutkha Raid