कळमनुरी पाणीपुरवठा खंडित

पाणीपुरवठा करणारे स्टार्टर जळाल्याने कळमनुरी शहरातील पाणीपुरवठा खंडित

Kalamnuri Water Supply: शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कडपदेव पंपहाऊस येथील ९० एचपी क्षमतेच्या पंपाचा स्टार्टर खराब झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्या वर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा करणारे स्टार्टर जळाल्याने कळमनुरी शहरातील पाणीपुरवठा खंडित

Kalamnuri Water Supply

कळमनुरी (Kalamnuri Water Supply) : शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कडपदेव पंपहाऊस येथील ९० एचपी क्षमतेच्या पंपाचा स्टार्टर खराब झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्या वर परिणाम होण्याची शक्यता आहे. सदर स्टार्टरची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी अंदाजे दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे. पंपाचा स्टार्टर दुरुस्त होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, (Kalamnuri Water Supply) नागरिकांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक यांनी केले आहे.

टैग्स: Kalamnuri Water Supply

संबंधित सामग्री

कळमनुरी शहराच्या पाणी पुरवठा केंद्राची नगराध्यक्ष प्रतिनिधींकडून पाहणी

कळमनुरी शहराच्या पाणी पुरवठा केंद्राची नगराध्यक्ष प्रतिनिधींकडून पाहणी

Kalamnuri Water Supply Centre: शहराचा पाणी पुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला होता. पंप हाऊस येथील स्टार्टर खराब झाल्याने पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता.

Sep 04, 2026