Kalamnuri Sub District Hospital

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी (दि. 18 जुलै) कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

Kalamnuri Sub District Hospital

कळमनुरी : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी (दि. 18 जुलै) कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी अपघात विभाग, प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया विभाग, जनरल वॉर्ड तसेच इतर विभागांची पाहणी करून रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.

पाहणीदरम्यान काही बेडवर बेडशीट व्यवस्थित अंथरलेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात स्वच्छता, शिस्त आणि रुग्णसेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत सर्व बेडवर स्वच्छ व व्यवस्थित बेडशीट उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील औषधसाठा, स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, कर्मचारी उपस्थिती तसेच विविध सुविधांचीही तपासणी केली. रुग्णांना दर्जेदार, तत्पर आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

अचानक भेटीने प्रशासनाची धावपळ

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अचानक भेटीमुळे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनात काही काळ धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध विभागांची पाहणी करताना त्यांनी अधिकारी व डॉक्टरांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना काही काळ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

बंद लिफ्टची अनुभूती जिल्हाधिकाऱ्यांनाही

रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी लिफ्टजवळ जाऊन बटण दाबले असता लिफ्ट सुरू झाली नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संबंधित लिफ्ट बंद असल्याची माहिती दिली. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातील लिफ्ट कायम बंद असल्याचा अनुभव रुग्णांप्रमाणेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनाही आल्याचे यावेळी समोर आले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026