ओबीसी १६, अनुसूचित जमाती २१ तर २५ जागा जमातीसाठी आरक्षित
आखाडा बाळापूर/ कळमनुरी (Kalamnuri Gram Panchayat Reservation) : तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ९ सप्टेंबर बुधवार रोजी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत झाली. यामध्ये तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत करण्यात आली यामध्ये तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण जाहीर झाले.ओबीसी १६, अनुसूचित जमाती २१ तर २५ जागा जमातीसाठी आरक्षित झाल्या आहेत. यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे, नायब तहसीलदार बाळाप्रसाद धुत, संजय पाटील, खिल्लारे, अब्दुल खालेद आदींची उपस्थिती होती.
अनुसूचित जाती महिला- मध्ये कोंढूर, गौळबाजार, चाफनाथ, जवळा पांचाळ, बाभळी, भोसी, माळेगाव, म्हैसगव्हाण, रुपूर, येगाव या गावचा समावेश आहे. अनुसूचित जाती सर्व साधारण- चिखली, डिग्गी, डोंगरकडा, धानोरा, पेठवडगाव, बेलथर/गोटेवाडी, वरुड, येहळेगाव गवळी, शेनोडी, साळवा, वडगाव त.ज.अनूसूचित जमाती महिला- उमदरवाडी, उमरा, खरवड, डिग्रस त.कोंढूर, डोंगरगाव पुुल, दाती, बेलमंडळ, बोल्डा, मोरवड, शिवणी बु., शेवाळा, सांडस त.ना., हिवरा त.जवळा, आसोलावाडी, कामठा, गोर्लेगाव, घोळवा, िंचचोर्डी, डिग्रस बु., नवखा त.क., बऊर, रेडगाव, वाई, सेलसुरा, हारवाडी. नागरीकाचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी)- नरवाडी, गारोळ्याची वाडी, मुंढळ, गुंडलवाडी, बोल्डावाडी, ढोलक्याची वाडी, तरोडा, फुटाना. नागरीकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (ओबीसी)- भुरक्याची वाडी, डोंगरगाव नाका, कडपदेव, पिंपरी खु., जरोडा, जांब त.शी., रामेश्वर तांडा,भाटेगाव. सर्वसाधारण पुरुष-आसोला, आखाडा बाळापूर, देवजना, कांडली, कान्हेगाव, नांदापूर, किल्लेवडगाव, जांभरून, झरा, कुंभारवाडी त.चाफनाथ, झुनझुनवाडी, कृष्णापूर त. शेवाळा, पाळोदी, दाभडी, जटाळवाडी, मसोड, महारी बु., महारी खू., माळधावंडा, येहळेगाव तु., रुद्रवाडी, वारंगा त. नांदापूर, सापळी, कोपरवाडी, खापरखेडा, तेलंगवाडी, कवडी, रामेश्वर, तोंडापूर, वाकोडी, दांडेगाव, रामवाडी. सर्वसाधारण महिला- कसबेधावंडा, काळ्याचीवाडी, निमटोक, घोडा, पावनमारी, पिंपरी बु., पुयना, पोतरा, बिबगव्हाण, कुंभारवाडी त.कु., जामगव्हाण त.ज., कुपटी, येडशी, येलकी, कुर्तडी, टाकळी कान्होबा, रेणापूर, तुप्पा, चुंचा, सालापूर, सालेगाव, सावंगी भुतनर, सोडेगाव, आडा, कवडा, सिंदगी, बोथी, सुकळी वीर, टोव्हा, पार्डी, कळमकोंडा खु., वारंगा फाटा या गावांचा समावेश आहे.