कळमनुरी नाली बांधकाम

व्यापाऱ्या व नागरिकाचे मागणीला नगराध्यक्षाची दखल; आत्ता पाईपलाईन जागी होणार नालीचे बांधकाम

Kalamnuri Drain Construction: शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना रस्त्याच्या दुतर्फा ड्रेनेजसाठी २४ इंची पाईप टाकण्याचे काम सुरू होते.

व्यापाऱ्या व नागरिकाचे मागणीला नगराध्यक्षाची दखल; आत्ता पाईपलाईन जागी होणार नालीचे बांधकाम

Kalamnuri Drain Construction

कळमनुरी (Kalamnuri Drain Construction) : शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना रस्त्याच्या दुतर्फा ड्रेनेजसाठी २४ इंची पाईप टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, पाईपमध्ये कचरा अडकल्यास संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था ठप्प होऊन सांडपाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने व्यापारी बांधव व नागरिकांनि पाईप ऐवजी नाली बांधकाम करावे, अशी मागणी नगराध्यक्षाकडे केली होती.

या (Kalamnuri Drain Construction) मागणीची दखल घेत नगराध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी ऊर्फ आर. आर. पाटील यांनी मुख्य बाजारपेठेतील बुडकी नालीपर्यंत पाईप टाकण्याऐवजी मजबूत व दर्जेदार सी.सी. नाली बांधण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, नगरसेवक बबलू पत्की, प्रकाश नाईक, , गजानन ऊर्फ बाळू पाटील ,उमेश सोमानी , डॉक्टर महाजन,यांच्यासह व्यापारी बांधव व नागरिक उपस्थित होते.