कळमनुरी सामूहिक विवाह सोहळा

कळमनुरीत बागवान बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध

Kalmanuri marriage ceremony: कळमनुरीत बागवान बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांनी विवाह केला. या सोहळ्याला सामाजिक एकत्रीकरण आणि आर्थिक बचतीचा संदेश देण्यात आला.

कळमनुरीत बागवान बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध

Kalmanuri marriage ceremony

कळमनुरी (Kalmanuri marriage ceremony) : बागवान बरादरीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. समाजातील एकोप्याची भावना जपत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात सहा जोडपी विवाहबंधनात अडकली. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव, नातेवाईक तसेच मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक धार्मिक विधी व मंगलमय वातावरणात विवाह सोहळा पार पडला. नवविवाहित जोडप्यांवर उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

या (Kalmanuri marriage ceremony) कार्यक्रमाला हाजी मोहम्मद उसमान बागबान (बागबान बिरादरी चाळीस गावांचे सदर), मौलाना फेरोज रजा सिबतैनी मंगरुळ पीर, मुफ्ती अ. हफीज अजहरी, हाफीज शफीक रजा, मुफ्ती शुजाअत फारुकी, चांद मिया, हाफीज तौफीक रजा, मौलाना इकबाल रजा, हाफीज फारुक, हाफीज आमेर, मौलाना अलफैज रजा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आमदार संतोष बांगर, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, आर. आर. पाटील, हिंगोलीचे उपनगराध्यक्ष अब्दुल माबुद बागबान, कळमनुरीतील नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कळमनुरी बागबान बिरादरी पंच कमेटीने विशेष नियोजन व परिश्रम घेतले. पंच कमेटीचे अध्यक्ष निजामोद्दीन बागबान यांच्या नेतृत्वाखाली मुबीन बागबान, हाजी अ. खयुम बागबान, शेख नयीम बागबान, मो. खाजा बागबान, हाजी अब्दुल गणी बागबान, अ. लतीफ बागबान, हाजी अ. हबीब बागबान, मो. फारूक बागबान, गुलाम बागबान, नसीर बागबान, हाजी मो. खाजा बागबान, शेख बुरहान बागबान, संडल बागबान, नुरोद्दीन बागबान आणि वजीर बागबान यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विवाह खर्च कमी होऊन समाजात एकोप्याचा संदेश दिला जात असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

संबंधित सामग्री

कळमनुरीत गँगवार: गोळीबारात एक ठार चौघे जखमी

कळमनुरीत गँगवार: गोळीबारात एक ठार चौघे जखमी

Kalamnuri Gang War: कळमनुरीत जुलै १५ रोजी नाइट एक गोळीबारीत एक ठार, चार जखमी झाल्या; सात आरोपी ताब्यात घेतल्या. पोलिसांनी दहा आठवड्यापूर्वी गनहा दाखल करून आरोपीवर कट्टर

Jul 16, 2026
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

Shaktipeth Highway Protest: कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात तालुक्यातील विविध भागातील सुपिक शेतजमीन जात असल्याने शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढत आहे.

Jun 28, 2026
कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Kalamanuri Gram Panchayat: कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर  झाला आहे.राज्य निवडणूक आयोगाने  सन २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या

Jun 04, 2026
जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून; कळमनुरीतील सहा जणांविरुद्ध गुन्हा

जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून; कळमनुरीतील सहा जणांविरुद्ध गुन्हा

Kalmanuri youth murder: कळमनुरीत, एक भांडणातून 23 वर्षीय तरुण नवनाथ शिवाजी बेद्रे याचा दगडाने खून केला गेला. पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे,

May 24, 2026
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 36 जोडपी विवाहबद्ध!

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 36 जोडपी विवाहबद्ध!

Mass wedding ceremony: लातूरमध्ये व्ही. एस. पँथर्सच्या उपक्रमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 36 जोडपे विवाहबद्ध झाली, समारोहात मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती.

May 12, 2026