जामगव्हाण इसम मृतदेह

जामगव्हाण पाटीनजीक एक हात व डोके नसलेला अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

Jamgavhan Pati Dead Body: जामगव्हाण पाटी नजीक राष्ट्रीय महामार्गालगत एक हात व डोके नसलेला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. ६ सप्टेंबर रोजी मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने..

जामगव्हाण पाटीनजीक एक हात व डोके नसलेला अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

Jamgavhan Pati Dead Body

वारंगा फाटा (Jamgavhan Pati Dead Body) : येथून दोन किमीवर असलेल्या जामगव्हाण पाटी नजीक राष्ट्रीय महामार्गालगत एक हात व डोके नसलेला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. ६ सप्टेंबर रोजी मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने जामगव्हाण येथील पोलीस पाटलाने पोलिसांना माहिती दिली. एक हात व डोके नसलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून हा प्रकार घातपाताचा  असल्याची जोरात चर्चा सुरू आहे.      
 
वारंगा फाट्यापासून जवळच असलेल्या जामगव्हाण पाटी ते भवानी मंदिर नजीक राष्ट्रीय महामार्ग ३६१ लगत खोलगट व ओसाड जागेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या अंगावर काळा रंगाचे टी-शर्ट आणि बरमोडा अशा अवस्थेत आहे. हा मृतदेह चार ते पाच दिवसापासूनचा असावा असा अंदाज आहे. सदरील मृतदेहाचा उजवा हात बगले पासून कापण्यात आला आहे. तर डोके नसलेल्या अवस्थेत आहे. (Jamgavhan Pati Dead Body) सदरील मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने जामगव्हाण येथील पोलीस पाटलाने सदरील घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनला दिली. ही माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते , वारंगा फाटा पोलीस मदत केंद्राचे संतोष नागरगोजे, गणेश गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

ह्या प्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे मोहन भोसले, श्वान पथक व फॉरेनसीक टिम घटनास्थळी  पाहणी केली. सदरील अनोळखी मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आला आहे.  राष्ट्रीय महामार्ग लगत अनोळखी मृतदेह आढळून आल्याने पोलिसांसमोर आवाहन उभे ठाकले आहे. सदरील घटनेत घातपात असल्याचे बोलले जात आहे. या (Jamgavhan Pati Dead Body) घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रवासी व गावकरी भयभीत झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.