Jalna Dairy Raid

जालन्यात दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; हजार लिटर दुधाचे नमुने तपासणीसाठी सील

राज्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेला अधिक गती मिळाली असून, विविध ठिकाणी सातत्याने तपासण्या केल्या जात आहेत.

जालन्यात दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; हजार लिटर दुधाचे नमुने तपासणीसाठी सील

Jalna Dairy Raid

भेसळविरोधी मोहिमेला वेग; पटेल दूध डेअरीची अचानक तपासणी, प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष

जालना (Jalna Dairy Raid) : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेला अधिक गती मिळाली असून, विविध ठिकाणी सातत्याने तपासण्या केल्या जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत जालना शहरातील दुखी नगर परिसरातील पटेल दूध डेअरीवर बुधवारी सायंकाळी अचानक छापा टाकण्यात आला.

तपासणीदरम्यान डेअरीमध्ये सुमारे एक हजार लिटर म्हशीचे दूध साठवून ठेवलेले आढळले. अधिकाऱ्यांनी नियमानुसार दुधाचे नमुने संकलित करून ते सील केले असून, हे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अन्न विश्लेषक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रशासकीय कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत तसेच भेसळ रोखली जावी, या उद्देशाने राज्यभरात नियमित तपासण्या सुरू आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत वाढती जनजागृती लक्षात घेऊन या विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

ही कारवाई सहायक आयुक्त नि. सु. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुजा नगरारे आणि नमुना सहाय्यक धम्मदीप नरवडे यांच्या पथकाने पार पाडली. संपूर्ण तपासणी प्रक्रियेत सर्व नमुने नियमानुसार संकलित करून पुढील चाचणीसाठी पाठवण्यात आले.

दरम्यान, पटेल दूध डेअरीचे मालक अजीम पटेल यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्या डेअरीतील दूध नियमितपणे तपासणीसाठी घेतले जाते आणि आतापर्यंत सर्व अहवालांमध्ये दूध शुद्ध व दर्जेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजची तपासणीही नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्राहकांना दिले जाणारे दूध स्वतःच्या म्हशींपासून मिळत असल्याने गुणवत्ता आणि शुद्धतेत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचा दावाही त्यांनी केला.

सध्या या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालावर अवलंबून असून, प्रशासन आणि डेअरी व्यवस्थापन दोघांचेही लक्ष या अहवालाकडे लागले आहे. दरम्यान, राज्यभरातील अशा कारवायांमुळे भेसळविरोधी मोहिमेची जोरदार चर्चा सुरू असून, या पावलांचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

संबंधित सामग्री

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

संजय राऊतांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून कथित वसुली आणि ‘क्लोजिंग नोटिस’ प्रकरणांची स्वतंत्र चौकशी मागितली.

Sep 28, 2026
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणला जाणारा १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा FDAने जप्त केला. सहा तासांच्या पाठलागानंतर ट्रक ताब्यात; चौघांवर गुन्हा दाखल.

Sep 20, 2026
दुधातील भेसळ रोखली, पण दर वाढले; पुण्यात प्रतिलिटर १० रुपयांची वाढ

दुधातील भेसळ रोखली, पण दर वाढले; पुण्यात प्रतिलिटर १० रुपयांची वाढ

FDAच्या भेसळविरोधी कारवाईनंतर दुधाचा पुरवठा घटल्याने पुणे जिल्ह्यात दर वाढले आहेत. ३५ रुपयांवरून दूध सुमारे ४५ रुपये लिटर झाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Sep 19, 2026
पुण्यातील द न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव; अन्न परवाना तात्काळ निलंबित

पुण्यातील द न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव; अन्न परवाना तात्काळ निलंबित

पुण्यातील द न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये झुरळे, कीटक, उंदराची विष्ठा आणि अस्वच्छता आढळल्याने FDAने अन्न परवाना निलंबित केला. मोहिमेत 14 आस्थापनांवर कारवाई झाली.

Sep 18, 2026