Indian Navy

जिद्द, मेहनत आणि देशसेवेच्या ध्यासातून क्रिशनव चव्हाणची भारतीय नौदलात निवड

आमदरीच्या क्रिशनव चव्हाणची भारतीय नौदलात एसएसआर पदावर निवड; आर्मीच्या मेडिकलमध्ये अपयशानंतर जिद्दीने तयारी करत मिळवले यश.

जिद्द, मेहनत आणि देशसेवेच्या ध्यासातून क्रिशनव चव्हाणची भारतीय नौदलात निवड

Indian Navy

आमदरीच्या तरुणाने एसएसआर पदावर मिळवले यश; आर्मीच्या वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरल्यानंतर पुन्हा तयारी करत नौदलाची परीक्षा केली उत्तीर्ण

मानोरा : बालपणापासून मनात असलेले देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत, शिस्त आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तालुक्यातील आमदरी येथील क्रिशनव चव्हाण याने भारतीय नौदलात यश मिळवले आहे. त्याची भारतीय नौदलात एसएसआर (सीनियर सेकंडरी रिक्रुट) पदासाठी निवड झाली असून, आगामी काळात प्रशिक्षण पूर्ण करून तो देशसेवेत दाखल होणार आहे.

क्रिशनव चव्हाण याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भंडारा येथील संत शिवराम विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. लहानपणापासूनच त्याला देशसेवेची ओढ होती. हे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीबाबत त्याने शाळेतील शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतले.

यानंतर आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्याने पुणे येथील नामांकित ‘गरुड झेप’ अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. तेथे शिस्त, नियमित कसरत, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने सैन्य भरतीसाठी तयारी सुरू ठेवली.

दरम्यान, बालपणी पाहिलेले आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले होते. क्रिशनवची भारतीय आर्मीमध्ये पहिल्यांदा निवड झाली; मात्र वैद्यकीय चाचणीत तो अपात्र ठरला. या अपयशानंतरही त्याने हार न मानता पुन्हा तयारी सुरू केली.

त्यानंतर त्याने भारतीय नौदलाची परीक्षा दिली. या परीक्षेत त्याने यश संपादन केले आणि आता त्याची भारतीय नौदलाच्या एसएसआर पदावर निवड झाली आहे. आगामी काही दिवसांत नौदलात दाखल होऊन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो देशसेवेत रुजू होणार आहे.

क्रिशनवचे वडील विवेक चव्हाण हे जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. मुलाची भारतीय नौदलात निवड झाल्याने चव्हाण कुटुंबीय आनंदित झाले असून, त्याच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026