आंतरराष्ट्रीय योग दिवस

​निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने रोज योगा करावा: आमदार संतोष बांगर

International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिवसावरील कार्यक्रमात आमदार संतोष बांगर यांनी सार्वजनिकांना नियमित योगासने करण्याचे आव्हान दिले. त्यांनी लहानपणापासून वयोवृद्धपर्यंत सर्वांसाठी योगा...

​निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने रोज योगा करावा: आमदार संतोष बांगर

International Yoga Day

 

हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

हिंगोली (International Yoga Day) : आज जगभरात जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने हिंगोली शहरातील निर्मल  फिटनेस मध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार बांगर यांनी स्वतः उपस्थित राहून योगासने केली. कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार संतोष बांगर यांनी सर्व जनतेला आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. "योगा हा कोणत्याही एका वयापुरता मर्यादित नसून, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने तो केला पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगा हाच उत्तम पर्याय आहे," असे ते म्हणाले.

​नियमित योगासने केल्यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. त्यामुळे केवळ आजच्या (International Yoga Day) दिवसापुरतेच मर्यादित न राहता, सर्व नागरिकांनी दररोज न चुकता योगा करावा, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी शहरातील नागरिक, तरुण वर्ग आणि जिममधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026