एचएसआरपी नंबर प्लेट

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई

HSRP Number Plate: एचएसआरपी (उच्चसुरक्षा क्र.पाटी) न बसवलेल्या सर्व वाहनांवर १ जुलैपासून कायदा लागू होईल. ३० जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतल्यास कायदेशीर कारवाई बचावत नाही.

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई

HSRP Number Plate


३० जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना दिलासा 
नागरिकांनी तातडीने एचएसआरपी बसविण्याचे आवाहन

हिंगोली (HSRP Number Plate) : हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० नुसार सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. दि. १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी न बसविणाऱ्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, दि. ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या दि. १८ मे २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार दि. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे दि. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय, एचएसआरपी (HSRP Number Plate) न बसविणाऱ्या वाहनधारकांच्या वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे आदी कामांवर यापूर्वीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, यापुढे एचएसआरपी नसलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळता) करण्यात येणार नाहीत. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी तात्काळ आपल्या वाहनांना एचएसआरपी बसवून घेऊन कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन हिंगोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर  यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेटवर RTOची धडक कारवाई; दोन महिन्यांत 57,888 वाहनांवर दंड

महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेटवर RTOची धडक कारवाई; दोन महिन्यांत 57,888 वाहनांवर दंड

महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांविरोधात RTOची कारवाई सुरू असून 1 जुलै ते 31 ऑगस्टदरम्यान 57,888 वाहनांवर कारवाई करून ₹1.16 कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला.

Sep 09, 2026
HSRP नंबर प्लेट नसेल तर कारवाईचा बडगा! महाराष्ट्र परिवहन विभागाकडून विशेष पथके तैनात

HSRP नंबर प्लेट नसेल तर कारवाईचा बडगा! महाराष्ट्र परिवहन विभागाकडून विशेष पथके तैनात

​​​​​​​महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Aug 13, 2026
HSRP Number Plate Deadline: १ जुलैपासून कारवाई अटळ! २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP अनिवार्य; RTO सेवाही होणार बंद

HSRP Number Plate Deadline: १ जुलैपासून कारवाई अटळ! २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP अनिवार्य; RTO सेवाही होणार बंद

राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी शासनाने ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

Jun 29, 2026