हिंगोली जलेश्वर तलाव

हिंगोलीतील जलेश्वर तलावाला लोखंडी कठड्यांचे कवच 

Hingoli Jaleshwar Lake: हिंगोलीतील जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कठडे

हिंगोलीतील जलेश्वर तलावाला लोखंडी कठड्यांचे कवच 

Hingoli Jaleshwar Lake

पर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू

हिंगोली (Hingoli Jaleshwar Lake) : हिंगोली शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या ऐतिहासिक जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. खोलीकरणानंतर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, सुरक्षेच्या दृष्टीने तलावाभोवती मजबूत लोखंडी कठडे बसवण्यात आले आहेत. यामुळे तलाव पूर्णपणे संरक्षित झाला आहे. (Hingoli Jaleshwar Lake) जलेश्वर महादेव मंदिर परिसरात असलेल्या या तलावाच्या खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी व पाण्याचे संरक्षण करण्यासाठी पाण्यालगत लोखंडी कठडे उभारण्यात आले आहेत. हे कठडे केवळ सुरक्षितताच देत नाहीत, तर तलावाच्या सौंदर्यातही भर घालत आहेत. आता सर्व बाजूंनी तलावाचे मनोहारी दर्शन घेता येणार आहे.  
 
या (Hingoli Jaleshwar Lake) प्रकल्पांतर्गत तलावाच्या बाजूने रुंद रस्ता, वॉकिंग ट्रॅक, भव्य सभागृह आणि नागरिकांना बसण्यासाठी विशेष जागांची निर्मिती करण्यात येत आहे. तलावाच्या मध्यभागी महादेवाची भव्य मूर्ती उभारणे, संरक्षण भिंत बांधणे आणि गाळ काढण्याची कामेही योजनेत समाविष्ट आहेत. जलेश्वर मंदिर आणि सुशोभित तलावाचा नयनरम्य परिसर लवकरच हिंगोलीकरांसह बाहेरील पर्यटकांनाही आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हे ठिकाण हक्काचे ठिकाण ठरणार आहे. शहराच्या मध्यभागी निसर्ग आणि अध्यात्माचा संगम घडवणारा हा (Hingoli Jaleshwar Lake) प्रकल्प हिंगोलीच्या सौंदर्यात नक्कीच मोलाची भर टाकेल.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026