कुत्र्याचा हल्ला

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी वानराच्या पिल्लाचे वाचविले प्राण

Dog Attack: हिंगोलीत एका वानराच्या पिल्लावर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेने वन्यजीव संरक्षण संस्था सदस्यांनी तातडीने उपचार करून पिल्लाचे जीवन वाचवले.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी वानराच्या पिल्लाचे वाचविले प्राण

Dog Attack

हिंगोली (Dog Attack) : कोषागार कार्यालयाच्या बाजूला कुत्र्यांच्या एका टोळीने वानराच्या पिल्लावर हल्ला केला होता. या (Dog Attack) हल्ल्यात पिल्लाच्या हात, पाय आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या होत्या. कुत्र्यांच्या भीतीने हे जखमी पिल्लू जवळच असलेल्या एका खोलीत शिरले होते.

ही बाब स्थानिक नागरिक प्रितेश राटनालू यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने वन्यजीव व पर्यावरण संरक्षण संस्थेला माहिती दिली. माहिती मिळताच वन्यजीव व पर्यावरण संरक्षण संस्थेचे ओम जाधव, रामप्रसाद जाधव, सचिन भंडारी आणि सुफियान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. लक्ष्मणभाऊ यादव यांच्या साह्याने पिल्लावर तातडीने उपचार करण्यात आले. जखमा खोल असल्याने डॉक्टरांनी टाके मारून पिल्लाची प्रकृती स्थिर केली. या (Dog Attack) उपचाराचा संपूर्ण खर्च प्राणी मित्रांनी स्वतः उचलला. या संपूर्ण बचाव मोहिमेत
विभागीय वनाधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सचिन माने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026