हिंगोलीत शासकीय रुग्णालय

हिंगोलीत शासकीय रुग्णालय परिसरात पाणपोईचे उद्घाटन, रुग्ण व नातेवाईकांची तहान भागणार

Hingoli Government Hospital: हिंगोलीतील शासकीय रुग्णालय परिसरात श्री साई माऊली अक्षय साई पात्र सेवेने नवीन पाणपोईचे उद्घाटन केले. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत थंड पाणी उपलब्ध होणार.

हिंगोलीत शासकीय रुग्णालय परिसरात पाणपोईचे उद्घाटन, रुग्ण व नातेवाईकांची तहान भागणार

Hingoli Government Hospital

हिंगोली (Hingoli Government Hospital) : श्री साई माऊली मंदिर रिसाला बाजार, हिंगोली अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या श्री साई माऊली अक्षय साई पात्र सेवेच्या वतीने आज मंगळवार, 5 मे 2026 रोजी शासकीय रुग्णालय परिसरात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.

शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री रामचंद्रजी कयाल यांनी अक्षय साई पात्र अन्नछत्र सेवेकडे थंड पाण्याचे फिल्टर अर्पण केले. त्यांच्या हस्ते या पाणपोईचे लोकार्पण झाले. या उपक्रमामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व थंड पाणी मोफत उपलब्ध होणार आहे.

या (Hingoli Government Hospital) प्रसंगी शहरातील नामांकित डॉक्टर मनीष बगडिया, निनाजी कांडेलकर, संतोष गुठ्ठे, अंतोष गुठ्ठे, आनंदरावजी पतंगे, संजय ननवरे, गजानन महाजन, आनंद महाराज पुरोहित, बंडू दंडगे, दीपक लोखंडे, किशोर लोलगे, माधवराव घुगे, आदित्य ननवरे, नागेश झळके, काना हाणवते, सुशील खंदारे, मनोज खंदारे यांच्यासह अनेक मान्यवर व सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री साई माऊली अक्षय साई पात्र सेवा रिसाला बाजार हिंगोलीच्या वतीने वर्षभर अन्नदानासोबतच आता पाणपोईच्या माध्यमातून सेवा दिली जाणार आहे. उन्हाळ्यात रुग्णालय परिसरात पाण्याची सोय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले व दात्यांचे आभार मानले.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026