मतदार यादी मॅपींग

मतदार यादी मॅपींगसाठी जिल्हाधिकाऱ्यांची थेट मतदारांशी भेट

Electoral Roll Mapping: हिंगोली जिल्ह्यात विशेष मतदार मॅपींग कार्यक्रम सुरू असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.

मतदार यादी मॅपींगसाठी जिल्हाधिकाऱ्यांची थेट मतदारांशी भेट

Electoral Roll Mapping

हिंगोली (Electoral Roll Mapping) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये लवकरच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात मतदार मॅपींगच्या कामाला वेग देण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज ९४-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत मॅपींगच्या कामकाजाची पडताळणी केली.

जिल्ह्यात मतदार मॅपींगची प्रक्रिया दिनांक २० जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ९२-वसमत मतदारसंघात ८७.१७ टक्के, ९३-कळमनुरी मतदारसंघात ९०.२० टक्के आणि ९४-हिंगोली मतदारसंघात ८७.७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचा एकूण प्रगती दर ८८.३६ टक्के असून अद्याप सुमारे १ लाख १४ हजार मतदारांचे मॅपींग बाकी आहे.

कामकाजात समाधानकारक प्रगती न झाल्यामुळे ५५ टक्क्यांपेक्षा कमी मॅपींग असलेल्या १२ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मतदार मॅपींग १०० टक्के पूर्ण करण्यासाठी दिनांक २५ व २६ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, सर्व (Electoral Roll Mapping) मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात दिवसभर काम करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार सिताराम साळसुंदर व मंगला मोरे आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मतदारांनी सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आपल्या पालक/आजोबांच्या नावाचा तपशील संबंधित केंद्रस्तरीय अधिका-याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026