हिंगोली गुटखा जप्त

हिंगोली शहरात  ४ लाख ९७ हजारांचा गुटखा जप्त, दोन आरोपींना अटक

Hingoli Gutkha Seized: हिंगोली शहरात पोलिसांनी अवैध गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. यात ४.९७ लाख रुपयांचा माल आणि दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.

हिंगोली शहरात  ४ लाख ९७ हजारांचा गुटखा जप्त, दोन आरोपींना अटक

Hingoli Gutkha Seized

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

हिंगोली (Hingoli Gutkha Seized) : शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका भाड्याच्या घरावर छापा टाकून तब्बल ४ लाख ९७ हजार ७२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. मंगळवार, ९ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. (Hingoli Gutkha Seized) हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात एका इसमाने भाड्याने घेतलेल्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पेन्शनपुरा येथील संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना मोठ्या प्रमाणात साठवलेला साठा आढळून आला. यामध्ये विमल पान मसाला, आर.के. सुगंधित पानमसाला, सुगंधित व्ही-१ तंबाखू, रजनीगंधा सुगंधित पान मसाला, असा एकूण ४,९७,०७२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.  या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना जाब विचारण्यासाठी ताब्यात घेतले आहे. आर्यन खान मुस्ताक खान रा. पेन्शनपुरा, शेख अझर शेख अनिस रा. आजम कॉलनी, हिंगोली, या दोघांसह आणखी एका आरोपीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही (Hingoli Gutkha Seized) यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस उपअधीक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक माधव जिव्हारे आणि त्यांच्या पथकाने किशोर सावंत, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, प्रशांत वाघमारे यांनी पूर्ण केली.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026