अ‍ॅड. सुरेश गडदे

हिंगोलीत अ‍ॅड. सुरेश गडदे यांचा ऐतिहासिक धडाका; एकाच दिवशी १०३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा

Adv. Suresh Gadade: हिंगोली जिल्हा न्यायालयात अ‍ॅड. सुरेश गडदे यांनी शनिवारी महालोक अदालतीत १०३ प्रकरणांचा निपटारा केला, त्यामध्ये सय्यद अलमासच्या प्रकरणात ६४ लाखांची नुकसान भरपाई मंजूर.

हिंगोलीत अ‍ॅड. सुरेश गडदे यांचा ऐतिहासिक धडाका; एकाच दिवशी १०३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा

Adv. Suresh Gadade

हिंगोली (Adv. Suresh Gadade) : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार ९ मे रोजी आयोजित 'महालोक अदालती' मध्ये हिंगोली जिल्हा न्यायालयातील प्रसिद्ध विधीज्ञ अ‍ॅड. सुरेश गडदे (Adv. Suresh Gadade) यांनी विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण मध्यस्थीने एकाच दिवसात तब्बल १०३ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणत पीडित कुटुंबांना न्याय मिळवून दिला. 

सय्यद अलमास यांच्या प्रकरणाचा ६४ लाखांत निकाल, या महालोक अदालतीतील सर्वात लक्षवेधी आणि मोठे प्रकरण सय्यद अलमास यांचे ठरले. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये दाखल झालेले हे प्रकरण अ‍ॅड. सुरेश गडदे यांच्या अत्यंत प्रभावी कायदेशीर पाठपुराव्यामुळे केवळ एका वर्षाच्या आत यशस्वीपणे निकाली निघाले. यामध्ये लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून ६४,००,००० रुपये (६४ लाख) इतकी मोठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अत्यंत कमी कालावधीत मिळालेल्या या मोठ्या दिलाशामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले  असून अ‍ॅड. गडदे यांच्या वेगवान कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

न्यायाधीश व विमा कंपन्यांचे मोलाचे सहकार्य या प्रकरणांच्या यशस्वी तडजोडीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी.एस. अकाली जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती माने तसेच तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ आर.एस. रोटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विविध विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्यामध्ये प्रामुख्याने लिबर्टी जनरल इन्शुरन्स  श्रद्धा किनारे (लीगल हेड) यांचे विशेष सहकार्य लाभले. चोलामंडल इन्शुरन्सचे योगेश धसे, ओरिएंटल इन्शुरन्सचे रमा गरडेकर, रिलायन्स इन्शुरन्सचे चव्हाण, टाटा एआयजी  आदिनाथ कदम या यशाबद्दल बोलताना अ‍ॅड सुरेश गडदे म्हणाले की, 'एकाच दिवशी १०३ प्रकरणांचा निकाल लावणे हे केवळ माझ्या एकट्याचे यश नसून माझ्या संपूर्ण टीमच्या अहोरात्र कष्टाचे फळ आहे.

याकामी त्यांना त्यांच्या कार्यालयातील सहकारी अ‍ॅड. मनीषा गडदे, अ‍ॅड. मुद्दाशीर, अ‍ॅड. अर्धापूरकर, अ‍ॅड. मस्के, अ‍ॅड. जगताप, अ‍ॅड. लेकुळे, अ‍ॅड. हराळ, अ‍ॅड. बोरकर, कापसे, पृथ्वी आखरे, गुनाराव पोले, कानिफनाथ दिंडे, देवराव कंठाळे, भगवान गडदे, अरविंद गडदे, कृष्णा नरोटे, ओम राऊत, गोपाल गडदे, माऊली गडदे,बाबुराव हराळे, पिनू लोंढे आणि हर्षद शहा यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकअदालती मुळे सर्वसामान्यांना दीर्घकाळ चालणार्‍या न्यायालयीन प्रक्रियेतून मुक्तता मिळून त्वरित आर्थिक आधार मिळत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026