हिंगोली वन्यजीव रक्षण

वन्यजीव रक्षणातील उल्लेखनीय कार्यासाठी हिंगोलीतील तीन वन्यजीव प्रेमींचा वनसंरक्षकांच्या हस्ते गौरव

Hingoli Wildlife Sanctuary: हिंगोलीच्या मंत्रिपरीषेत वन्यजीव रक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांना सनमानित करण्यात आले. तीन वन्यजिव प्रेमी पुढाकार घेऊन संरक्षणासाठी योगदान

वन्यजीव रक्षणातील उल्लेखनीय कार्यासाठी हिंगोलीतील तीन वन्यजीव प्रेमींचा वनसंरक्षकांच्या हस्ते गौरव

Hingoli Wildlife Sanctuary

हिंगोली (Hingoli Wildlife Sanctuary) : वनविभाग हिंगोली येथे आज वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन वन्यजीव प्रेमींचा विशेष सत्कार करण्यात आला.  विभागीय वन अधिकारी, वनविभाग हिंगोली यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात श्री संग्राम भालेराव रा. हिंगोली, श्री लक्ष्मण राऊत व श्री सुरेश सावंत यांना वन्यजीव रक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आले. मा. वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर श्री प्रमोद चंद लाकरा साहेब यांच्या हस्ते तिघांनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी मा. डॉ. राजेंद्र नाळे साहेब, सहाय्यक वनसंरक्षक श्री सचिन माने, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एल. पाटील, श्री एच. एन. जाधवर, श्री एम. एस. केंद्रे, श्री व्ही. बी. टाक, श्रीमती एल. एम. पवार व नागरगोजे उपस्थित होते. याशिवाय वनविभागाचे इतर कार्यालयीन व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन केलेल्या कार्याची दखल वनविभागाकडून घेण्यात आल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

संबंधित सामग्री

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त चिखली आगारात २०० वृक्षांचे रोपण

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त चिखली आगारात २०० वृक्षांचे रोपण

Chikhli ST Corporation: हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभर एकाच वेळी वृक्षारोपण करण्याचे आदेश महामंडळाने दिले होते.

Jul 14, 2026
हिंगोली  शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले  

हिंगोली शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले  

Hingoli Deer Rescue: कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस येथे २६ जून रोजी  हृदयस्पर्शी घटना घडली. शेतकरी गजाननराव पंतगे आपल्या शेतात हळदीची लागवड करीत असताना रानटी कुत्र्यांच्या एका कळपाने हरणाच्या पाडस

Jun 28, 2026