हिंगोली डिपी जळाल्या

डिपी जळाल्या; दूरूस्तीसाठी वाहनांच्या रांगाच रांगा

Hingoli DP Burnt: हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानामुळे विद्युत रोहित्र जळून खाक; शेतकरी नवीन रोहित्रांसाठी दीर्घकाळ रांगेत उभे राहत आहेत.

डिपी जळाल्या; दूरूस्तीसाठी वाहनांच्या रांगाच रांगा

Hingoli DP Burnt

जनित्र दूरूस्तीला दिरंगाईचा बसतोय फटका

हिंगोली (Hingoli DP Burnt) : जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार करत असतानाच ग्रामीण भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण भागातील विद्युत रोहित्र (Dp) जळण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून, नवीन रोहित्र मिळवण्यासाठी हिंगोलीतील खटकाळी येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकर्‍यांच्या पिकअप वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

उन्हाचा फटका रोहित्रांना (Hingoli DP Burnt) बसत आहे. परिणामी ग्रामीण भागात अंधार दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या तापमानामुळे विजेचा वापर वाढला आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार आणि वाढती उष्णता यामुळे गावागावांतील रोहित्र जळून खाक होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक गावे अंधारात असून, विहिरींना पाणी असूनही केवळ वीज नसल्याने पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे.

खटकाळी परिसरात पिकअपचा वेढा सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हिंगोली येथील खटकाळी भागात महावितरणचे मुख्य कार्यालय व भांडार आहे. जळालेले रोहित्र बदलून नवीन मिळवण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी स्वतः खासगी पिकअप वाहने भाड्याने घेऊन येत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की, खटकाळी परिसरात महावितरणच्या गेटपासून रस्त्यापर्यंत पिकअप वाहनांची गर्दी झाली असून, जणू 'पिकअपची जत्रा'च भरली की काय, असा भास होत आहे.

शेतकरी हैराण  झाले असुन प्रशासकीय दिरंगाईचा फटका त्यांना बसत आहे.  (Hingoli DP Burnt) एकीकडे कडक ऊन आणि दुसरीकडे जळालेली डीपी; अशा दुहेरी संकटात आम्ही सापडलो आहोत. पिकअपचे भाडे भरून दोन-दोन दिवस इथे रांगेत उभे राहावे लागत आहे,' अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत. रोहित्र उपलब्ध होण्यास होणारा उशीर आणि वाढती मागणी यामुळे शेतकर्‍यांचा संयम सुटत चालला आहे. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रोहित्रांचा पुरवठा तातडीने वाढवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026