हिंगोली शिक्षक मोर्चा

जुन्या पेन्शनसाठी हिंगोलीत शिक्षक दिनी शिक्षकांचा मोर्चा

Hingoli Teachers Protest: १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कायम आस्थापनेवर नियुक्त होऊन नंतर १००टक्के अनुदान प्राप्त झालेल्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा

जुन्या पेन्शनसाठी हिंगोलीत शिक्षक दिनी शिक्षकांचा मोर्चा

Hingoli Teachers Protest

 

२००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना १९८२ ची जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी

हिंगोली (Hingoli Teachers Protest) : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कायम आस्थापनेवर नियुक्त होऊन नंतर १००टक्के अनुदान प्राप्त झालेल्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियमितपणे लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वयक संघाच्या वतीने शिक्षक दिनी ५ सप्टेंबर शनिवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन राजपत्र वित्त विभाग दि. ३१ ऑक्टोबर २००५ नुसार १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्तांसाठी नवीन अंशदान पेन्शन योजना लागू आहे. मात्र वित्त विभागाच्या १९ जुलै २०११ च्या निर्णयानुसार २००५ पूर्वी मानधनावर शिक्षण सेवक म्हणून रुजू होऊन नंतर कायम झालेल्यांना (Hingoli Teachers Protest) जुनी पेन्शन लागू केली आहे. तसेच १ फेब्रुवारी २०२४ च्या निर्णयानुसार २००५ पूर्वी जाहिरात निघालेल्यांनाही जुनी पेन्शनचा लाभ देण्यात आला आहे.याशिवाय शालेय शिक्षण विभागाच्या १४ फेब्रुवारी १९७२ व ३ ऑगस्ट १९९२ च्या निर्णयानुसार विना-अनुदानित शाळेतील सेवाही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्याची तरतूद आहे.

तसेच २१ नोव्हेंबर १९८६ च्या निर्णयानुसार १ एप्रिल १९६६ पासून अनुदानित शाळेतील कर्मचार्‍यांना पेन्शन, ग्रॅच्युईटीचे लाभ सुरू आहेत.या सर्व शासन निर्णयांच्या आधारे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेले आम्ही सर्व कर्मचारी जुन्या १९८२ च्या पेन्शन योजनेस पात्र व हक्कदार आहोत. त्यामुळे आम्हाला नियमित जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी आग्रही मागणी शिक्षकांनी केली आहे. निवेदनावर टी. व्ही. कपाटे, विशाल शिंदे, वैजनाथ गाडे,  पी. डब्लु. घोंगडे, ए. डी. घुगे, बी. यु. जोशी, एन. टी. शिंदे, जी. एन. टवले, डी. पी. जगताप, बी. के. वाघमारे, के. एच. गुरांवा आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.