हिंगोली स्मार्ट मीटर विरोध

स्मार्ट मीटर विरोधात हिंगोलीत नागरीकांचा एल्गार

Hingoli Smart meters: हिंगोलीत कायम असलेल्या वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर लादण्याच्या योजनेविरुद्ध गंभीरता पूर्वक मागण्यांचा समूह जाहीर केला. ग्रीड सपोर्ट चॅर्जेस रद्द करणे, बिलिंग मॉडल

स्मार्ट मीटर विरोधात हिंगोलीत नागरीकांचा एल्गार

Hingoli Smart meters

 

महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा 
स्मार्ट मीटरची प्रतीकात्मक होळी
महावितरण विरोधात जोरदार घोषणा बाजी

हिंगोली (Hingoli Smart meters) : सुस्थितीत असलेले वीज मीटर बदलून ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादण्यास विरोध, सोलार ग्राहकांवरील ग्रिड सपोर्ट चार्जेस रद्द करावेत आणि व्न्न्Aप् ऐवजी पूर्वीप्रमाणे व्ेंप् पद्धतीने वीजबिल आकारणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हिंगोली शहरातील वीज ग्राहकांनी मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज ग्राहक संघटनेच्या नेतृत्वाखाली गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी स्मार्ट मीटरची प्रतीकात्मक होळी करून महावितरणच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

‘स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा’, ‘सुस्थितीतील मीटर बदलणे थांबवा’, ‘वीज ग्राहकांना न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. हिंगोलीतील महात्मा गांधी चौकातून निघालेला मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकला.  महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला. वीज ग्राहक संघटनेने मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्र्यांना उद्देशून दिलेल्या निवेदनात सुस्थितीत व कार्यरत असलेले मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी केली आहे.

 स्मार्ट मीटरमुळे चुकीची (Hingoli Smart meters) किंवा अधिक रीडिंग नोंदविल्यास ग्राहकांना त्याविरोधात तातडीने दुरुस्ती करून घेण्याची स्पष्ट यंत्रणा उपलब्ध आहे का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. ऑनलाइन पद्धतीने रीडिंग पाठविले जात असल्याने तांत्रिक बिघाड, व्होल्टेजमधील चढ-उतार अथवा सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेत वारंवार व्होल्टेज कमी-जास्त होणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि डीओ उडण्याच्या घटना घडत असताना स्मार्ट मीटरची अंमलबजावणी कितपत योग्य आहे, असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काही महिन्यांपर्यंत व्ेंप् पद्धतीने वीजबिल आकारले जात असताना कोणतीही प्रभावी पूर्वसूचना किंवा जनजागृती न करता व्न्न्Aप्  आधारित बिलिंग सुरू करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या बदलामुळे सामान्य ग्राहकांसह व्यापारी, लघुउद्योग आणि हॉटेल व्यावसायिकांच्या वीजबिलात वाढ झाल्याचा दावा करण्यात आला.  आधारित बिलिंगला स्थगिती देऊन पूर्वीची व्ेंप् पद्धत लागू करावी आणि अतिरिक्त आकारणी झालेल्या बिलांचा फेरआढावा घेऊन ग्राहकांना समायोजन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. स्वखर्चाने तसेच कर्ज काढून घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार्‍या ग्राहकांवर ग्रिड सपोर्ट चार्जेस लादणे अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या शासनाच्या धोरणालाच या शुल्कामुळे बाधा येत असून सौर प्रकल्पाचा परतावा कालावधी वाढत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. ग्रिड सपोर्ट चार्जेस तात्काळ रद्द करून नेट मीटरिंगची सुविधा कायम ठेवावी आणि विद्यमान सौर ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

स्मार्ट मीटर,  आधारित बिलिंग, सोलार ग्राहकांवरील शुल्क तसेच मीटर बदलण्याच्या प्रक्रियेबाबत महावितरण प्रशासनाने ग्राहकांना लेखी स्वरूपात स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वीज ग्राहक संघटनेने आपल्या निवेदनात वीज कायदा २००३, ग्राहक संरक्षण कायदा आणि मीटरिंगसंदर्भातील नियमांचा दाखला देत ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. दरम्यान, महावितरण कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे शहरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. स्मार्ट मीटरची करण्यात आलेली प्रतीकात्मक होळी आणि महावितरणविरोधातील घोषणाबाजी यामुळे या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान गांधी चौक येथे विविध मान्यवरांनी स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदविले. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावे अन्यथा नागरिकांनी स्मार्ट मीटर काढून फेकून द्यावे व थेट आकडा टाकून वीजपुरवठा करावा असा टोला देखील लगावला. यावेळी व्यापारी, विविध पक्षाचे नगरसेवक, विविध संघटना आदींचे पदाधिकारी तसेच वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

स्मार्ट मीटर सक्ती थांबवा, जुनेच मीटर ठेवा; अन्यथा 11 ऑगस्टला कार्यालयावर मोर्चा

स्मार्ट मीटर सक्ती थांबवा, जुनेच मीटर ठेवा; अन्यथा 11 ऑगस्टला कार्यालयावर मोर्चा

कार्यरत व अचूक असलेले वीज मीटर बेकायदेशीरपणे बदलू नयेत, स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी.

Jul 30, 2026
हिंगोलीत स्मार्ट मीटर विरोधात ११ ऑगस्टला धडक मोर्चा; ‘जुने मीटर परत द्या' ची मागणी

हिंगोलीत स्मार्ट मीटर विरोधात ११ ऑगस्टला धडक मोर्चा; ‘जुने मीटर परत द्या' ची मागणी

Smart Meter Morcha: हिंगोली जिल्ह्यातील वीज ग्राहक संघटना आणि हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ यांनी एकत्र येत स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय

Jul 29, 2026
स्मार्ट मीटरवर संतापाचा स्फोट! कोरचीत शिवसेनेचा इशारा; “जुने मीटर बसवा, नाहीतर आंदोलन”

स्मार्ट मीटरवर संतापाचा स्फोट! कोरचीत शिवसेनेचा इशारा; “जुने मीटर बसवा, नाहीतर आंदोलन”

Smart Meter Andolan: “स्मार्ट मीटरमुळे नागरिकांची लूट सुरू आहे” असा थेट आरोप करत जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे, शिवसेना तालुका प्रमुख सदाशिव श्यामराव नहाणे

Jul 24, 2026
स्मार्ट मिटर विरोधात राकाँ (श.प.) पक्षाचे तुडवा आंदोलन

स्मार्ट मिटर विरोधात राकाँ (श.प.) पक्षाचे तुडवा आंदोलन

Smart meter Andolan: महावितरण कंपनीने खाजगीकरणाच्या वाटचालीत स्मार्ट मिटर बसवण्याची योजना राबविली आहे. विज दरवाढ, स्मार्ट मिटरच्या  रुपाने महावितरण ग्राहकांच्या खिशातून पैसे वसुल

Jul 16, 2026
स्मार्ट मीटरचा सर्वसामान्य वीज ग्राहकाला 'शॉक'

स्मार्ट मीटरचा सर्वसामान्य वीज ग्राहकाला 'शॉक'

Nagpur Smart Meter: महावितरणकडून राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेविरोधात वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कार्यरत असलेले जुने डिजिटल मीटर अतिशय सुस्थितीत असतानाही

Jul 16, 2026