हिंगोली (Sirsam Accidental Death) : शहरातील वंजारवाडा पोळा मारोती भागातील २२ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मंगळवारी दुपारच्या सुमारास सिरसम जवळील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील सिरसम शिवारात शुभम मधुकर बांगर (२२) रा. पोळा मारोती वंजारवाडा हा युवक ट्रॅक्टर अपघातात १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला तात्काळ हिंगोलीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. यावेळी मयत शुभमचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्यावर हिंगोलीतील कयाधू नदीच्या तिरावरील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत शुभम बांगर हा घरामध्ये एकुलता एक मुलगा होता. त्याचा (Sirsam Accidental Death) अपघातात मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सिरसम अपघाती मृत्यू
हिंगोलीतील एकुलत्या एक मुलाचा सिरसम येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू
Sirsam Accidental Death: शहरातील वंजारवाडा पोळा मारोती भागातील २२ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मंगळवारी दुपारच्या सुमारास सिरसम जवळील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोककळा पसरली
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Sirsam Accidental Death
टैग्स:
Sirsam Accidental Death
marathi accident death
traktor hingoli
single child
traktor accident tragedy
shubham bangar hingoli
single child death
hingoli police report
संबंधित सामग्री
आडगाव बाजार येथील महिलेचा ओढ्याच्या पाण्यात वाहून मृत्यू; दौडगाव शिवारात आढळला मृतदेह
Flood Woman Death: आडगाव बाजारातील मंगल खंडागळे याने ओढ्याला वाहून गेल्याची घटना झाली. त्याचे मृतदेह औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगावला आढळले.
Jul 01, 2026