हिंगोली (Saint Savata Maharaj) : शहराजवळ असलेल्या अकोला बायपास भागातील छत्रपती संभाजी नगर, बळसोंड येथे श्री विठ्ठल-रुख्मणी व श्री सत सावता महाराज यांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा यांच्यासह कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ११ ऑगस्ट रोजी हभप भागवताचार्य व शिवपुराण कथाकार सागर महाराज पारिसकर, वाशिम म्हणाले की, संत सावता माळी हे वारकरी संप्रदायातील एक क्षेष्ठ संत होते. यानी कर्म हाच ईश्वर आहे असा संदेश दिला आहे.
हिंगोली शहरातील अकोला बायपास भागात छत्रपती संभाजी नगर परिसरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व मुर्ती नगर प्रदीक्षणा व देवता स्थापना यासह कीर्तन सोहळा व महाआरती असे विविध कार्यक्रम ८ ते ११ ऑगस्ट या दरम्यान घेण्यात आले. यावेळी आचार्य वे.मु.सुरेशदेव केदारे गुरू व त्यांचे सहकारी यांनी या सोहळ्यात सहभाग घेत संत सावता महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. १० ऑगस्ट रोजी प्राणप्रतिष्ठा व ११ ऑगस्ट रोजी कीर्तन सोहळा व महाआरती असे कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी भागवताचार्य व शिवपुराण कथाकार हभप श्री सागर महाराज पारिसकर, वाशिम यांनी कीर्तनातुन सांगितले की, संत सावता महाराज हे पंढरीला गेले नाहीत कारण त्यांचा विश्वास होता की, देवकर्मात आणि भक्ताच्या अंतःकरणात असतो त्याचे विचार सर्व समाजानी अंगीकारावेत असे आवाहन ही कीर्तनातुन यावेळी करण्यात आले. यावेळी हभप ओमप्रकाश नागुलकर गुरूजी यांनी श्री विठ्ठल-रुख्मणी व श्री संत सावता महाराज यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले.
या (Saint Savata Maharaj) शेवटच्या कीर्तन सोहळ्यात व महाआरतीला आ. संतोष बांगर,माजी आ. गजानन घुगे, नगर परिषद गट नेता श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष अ.माबुद बागवान, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली नगरसेवक चंद्रकांत लव्हाळे, माजी जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, नगरसेवक गुड्डु बांगर, नगरसेवक नाना नायक, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण, माजी जि.प.सदस्य संतोष गोरे, संदिप काळे, सोपान शिंदे, अनिकेत लव्हाळे, आत्माराम सातव, बळीराम सातव, वनिताताई गुंजकर, सुवर्णा गाभणे, सखाराम सारसकर, लिंबाजी थोरे, शाम राऊत , सि.ए. सुभाष पोपळघट, कैलास धामणे, बालाजी सोनुने, सुभाष कदम, वसंता वाघ, राजू लव्हाळे, विश्वास वानखेडे, देवकर, बाळु फंदे, कैलास काळे, राजु सातव, रमेश काळे, बापुराव काळे, स्वराज वाघ, नारायण धामणे, विठ्ठल सारसकर, के.टी.काळे, उदगिरे, पांडुरंग नाईक, किसन टेमकर, पारिसकर, भागवत काळे, अशोक बंडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान या प्राणप्रतिष्ठा व कीर्तन सोहळ्याला हजारो महिला -पुरूष, भाविक-भक्त उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.