हिंगोली नगर पालिका

जिल्ह्यात रिक्त असलेल्या तीन पैकी हिंगोली न.प. व औंढा ना. नगर पंचायतमध्ये मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती

Hingoli Municipal Council: हिंगोली नगर पालिका व औंढा नगर पंचायत मध्ये रिक्त पदावर दोन महिन्यांची प्रतिक्रिया मागण्यात आली. शासनाने मुख्याधिकार्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यात रिक्त असलेल्या तीन पैकी हिंगोली न.प. व औंढा ना. नगर पंचायतमध्ये मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती

Hingoli Municipal Council

 

हिंगोलीकरांना पावने दोन महिने प्रतिक्षा करावी लागली

हिंगोली (Hingoli Municipal Council) : हिंगोली नगर पालिकेसह औंढा नागनाथ, सेनगाव नगर पंचायतमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती झाली नव्हती. या ठिकाणी प्रभारी राज सुरू असताना शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या शासन निर्णयात हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती प्रांजली मुंडे तर औंढा नागनाथ नगर पंचायत मुख्याधिकारी पदी धनंजय उप्पलवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोघेही अधिकारी परिविक्षाधीन आहेत.

हिंगोली नगर पालिका (Hingoli Municipal Council) अ दर्जाची आहे. येथील मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांची १७ जूनला वाशिम येथे बदली करण्यात आली. त्यांना हिंगोली नगर पालिकेतून कार्यमुक्तही करण्यात आले. येथील प्रभारी मुख्याधिकारी पदाचा पदभार जिल्हा खनिकर्म अधिकारी अश्विनकुमार माने यांच्याकडे सोपविण्यात आला होता. हिंगोली मुख्याधिकारी पदी कोणाची नियुक्ती होती. याकडे हिंगोलीकरांचे लक्ष लागले होते. शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला राज्यातील २३ नगर पंचायत व नगर परिषद मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. ज्यामध्ये हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी पदी परीविक्षाधीन असलेल्या श्रीमती प्रांजली मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

त्याच प्रमाणे औंढा नागनाथ नगर पंचायतमध्ये (Hingoli Municipal Council) कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणुन निशीकांत प्रचंडराव हे होते. त्यांची बदली सन २०१९ मध्ये झाल्यानंतर आतापर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी लाभले नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रभारी राज सुरू होता. शेवटचे प्रभारी मुख्याधिकारी गणेश दत्ताप्पा गांजरे हे होते. शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या आदेशात परिविक्षाधीन मुख्याधिकारी धनंजय उप्पलवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत सेनगाव नगर पंचायतीला मुख्याधिकारी लाभले नसल्याने येथे प्रभारी मुख्याधिकारी पदी गणेश गाजरे हे कार्यरत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

Hingoli Municipal Council: राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील नमुना क्रमांक ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी बंधनकारक आहे की नाही याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संभ्रमावर नगर विकास

Sep 04, 2026
हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

Hingoli Stray Animals: हिंगोली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय निवारण केंद्र, जनावरांची ठिकाने, भु-नक्शा मोजणी व इतर १६ ठरावांना एकमताने पारित केला.

Aug 25, 2026
हिंगोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २५ ऑगस्टला

हिंगोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २५ ऑगस्टला

Hingoli Municipal Councils: हिंगोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

Aug 20, 2026
हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार

हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार

Hingoli Municipal Council: शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या शासन आदेशात हिंगोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांची नियुक्ती

Aug 10, 2026