हिंगोली जलेश्वर तलाव

कोट्यवधी रुपये खर्चातून जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण, अनेक पथदिवे बंद पडल्याने अंधाराचे साम्राज्य

Hingoli Jaleshwar Lake: जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणात कोट्यवधी खर्च झाला, परंतु पथदिव्यांचा लखलखाट सोडून गेला. पथदिवे बंद झाल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारामुळे सुरक्षितता धोकादायक

कोट्यवधी रुपये खर्चातून जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण, अनेक पथदिवे बंद पडल्याने अंधाराचे साम्राज्य

Hingoli Jaleshwar Lake

हिंगोली (Hingoli Jaleshwar Lake) : शहराच्या मध्यवर्ती भागातील जलेश्वर तलावाचे कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आले. तलावाभोवती संरक्षण भिंत, सिमेंट रस्ता आणि आकर्षक विद्युत खांब उभारून परिसर झगमगाट करण्यात आला होता. नंदी आणि त्रिशूलाच्या कलाकृती असलेले हे पथदिवे तलावाच्या सौंदर्यात भर घालत होते. मात्र सध्या या परिसरात चित्र वेगळेच दिसत आहे.

सुशोभीकरणानंतर सुरुवातीच्या काळात तलावाच्या चोही बाजूने पथदिव्यांचा लखलखाट दिसत होता. संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुतांश पथदिवे बंद अवस्थेत आहेत. संपूर्ण मार्गावर बोटावर मोजण्याइतकेच पथदिवे सुरू असून रात्रीच्या वेळी संपूर्ण रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. 

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, लाखो रुपये खर्च करून बसवलेले दिवे देखभालीअभावी बंद पडले आहेत. (Hingoli Jaleshwar Lake) अंधारामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. तलाव परिसरात असामाजिक तत्वांचा वावर वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. सुशोभीकरणाचा मुख्य उद्देशच अंधारामुळे फोल ठरत आहे. 

नगर परिषदेने कोट्यवधींचा निधी खर्च करून तलाव परिसर विकसित केला, पण दुरुस्ती आणि देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पथदिवे बंद पडून अनेक महिने उलटले तरी प्रशासनाचे याकडे लक्ष गेलेले नाही. तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

“इतका खर्च करून जर दोन दिवस प्रकाश राहत नसेल तर या सुशोभीकरणाला अर्थ काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तलाव परिसरातील बंद पथदिवे तातडीने सुरू करून रात्रीच्या वेळी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा ऐन सणासुदीच्या काळात हा परिसर अंधारातच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासन याची दखल घेऊन बंद पडलेले पथदिवे कधी सुरू करणार याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026