आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

...अखेर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

Adarsh ​​Gram Sevak Award: हिंगोलीमध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ग्रामसेवकांना सन्मानित केले गेले, ज्यात ग्रामपंचायत अधिकारी व विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.

...अखेर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

Adarsh ​​Gram Sevak Award

हिंगोली (

Adarsh ​​Gram Sevak Award

) : कामाची पावती म्हणून ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातोय याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आज येथे केले. येथील षटकोणी सभागृहात ग्रामपंचायत विभागामार्फत उत्कृष्ट व आदर्श कार्य करणाऱ्या (Adarsh ​​Gram Sevak Award) ग्रामसेवकांचा सन्मान सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर मांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड उपशिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के यांच्यासह गटविकास अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रामसेवकांनी गाव पातळीवर चांगल्या सेवा दिल्यास वेळेत लोकांची कामे पूर्ण केल्यास लोकांच्या तक्रारी आपोआप कमी होतात असे गायकवाड यावेळी म्हणाले.

ग्रामपंचायत पातळीवर काम करत असताना आपण आपले काम प्रामाणिकपणे व लोकांना समाधान मिळेल, असे काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले असून 23 मार्चपासून वंदे मातरम गीताबाबत ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यात येत आहे. ग्राम स्तरावरील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व्हाट्सअप चॅटबोटसह अंतर विभागीय समन्वय पोर्टल विकसित करण्यात आले  असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले. 

हिंगोली मध्ये हळदीच्या उत्पादनाला बचत गटाच्या माध्यमातून पिवळे सोनं म्हणून प्रोडक्शन केले आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर मांडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने यांनीही समयोचित भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी  केशव गडापोड यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

यावेळी (Adarsh ​​Gram Sevak Award) ग्रामपंचायत पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी लक्ष्मीकांत क्षीरसागर व दत्ता वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी  व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026