हिंगोली (Hingoli Hutment Dwellers) : शहरातील शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमण धारकांना शासनाच्या २५ मार्च २०२६ च्या निर्णयानुसार नियमित करून पट्टे द्यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
हिंगोली शहरातील पेन्शनपुरा, गवळीपुरा, बेलदारपुरा, मस्तानशहा नगर, सिद्धार्थ नगर, हुम्मावाडी, अण्णाभाऊ साठे नगर, बावनखोली, एचपी गॅस समोर, ५२ खोली, रिसाला, वंजारवाडा, निरंजन बाबा चौक, महादेववाडी, दत्त मंदिर समोरील परिसर येथे अनेक गरीब व गरजू कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून त्यांना वीज, पाणी, घरकुलसारख्या योजनांचा लाभ मिळाला आहे. शासन निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पूर्वीपासूनचे अतिक्रमण नियमित करता येणार असून त्यासाठी मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता कर पावती यासारखे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने पट्टे देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन शेख निहाल भैय्या यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून यावर माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, उपनगराध्यक्ष शेख निहाल भैय्या, नगरसेवक गणेशराव लुंगे, शेख शकील अहेमद, सय्यद आमेरअली, कय्युमखान पठाण, सय्यद बासीत मौलाना, सुखदेव बलखंडे, अॅड. अमित कळसरे, मुजीब कुरेशी, शहराध्यक्ष सय्यद जावेद राज, रुबिना मो. वाजीद, पठाण रफिक, संतोष खिल्लारे, शेख सोहेल, शेख शमशेर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.