तंबाखू-गुटखा दंडात्मक कारवाई 

खबरदार! शासकीय कार्यालयात तंबाखू-गुटखा खाल्ल्यास दंडात्मक कारवाई 

Tobacco-Gutkha Action:

खबरदार! शासकीय कार्यालयात तंबाखू-गुटखा खाल्ल्यास दंडात्मक कारवाई 

Tobacco-Gutkha Action

हिंगोली (Tobacco-Gutkha Action) : शासकीय कार्यालयात तंबाखू व गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे. कोटपा-२००३ च्या कलम ४ चे उल्लंघन करणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांकडून आज ३५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने आज शहरातील कृषी कार्यालय, नगर परिषद हिंगोली आणि जिल्हा परिषद हिंगोली येथे धडक कारवाई केली.

कारवाईदरम्यान कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थ (Tobacco-Gutkha Action) खाताना आढळलेले तसेच ते पदार्थ सोबत बाळगणारे कर्मचारी पकडण्यात आले. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. यावेळी मानसशास्त्रज्ञ श्री. कुलदीप केळकर आणि मेडिकल सोशल वर्कर श्री. आनंद साळवे उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जिल्हाभरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन अशी तपासणी पुढेही सुरू राहणार आहे. 
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की कर्तव्यावर असताना तंबाखू, गुटखा यांचे सेवन करू नये. तसेच कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनीही तंबाखूयुक्त पदार्थ सोबत आणू नयेत किंवा सेवन करू नये. नियमांचे उल्लंघन आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.
 

संबंधित सामग्री

राज्यात तंबाखू विक्रीवर बंदी...मग पानठेला विक्रेत्यांकडे माल येतोय कुठून? 

राज्यात तंबाखू विक्रीवर बंदी...मग पानठेला विक्रेत्यांकडे माल येतोय कुठून? 

Tobacco Sales Ban: महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू विक्रीवर जुलै २०१२ पासून बंदी लागू. मात्र बंदी लागू होऊन तब्बल १४ वर्षे उलटून गेली, तरीही ही अंमलबजावणी केवळ कागदोपत्री

Jun 24, 2026