वीज चोरी प्रकरण

वीज चोरी केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

Electricity theft case: हिंगोलील अंतुले नगरात गणेश मारोतराव कर्हाळे याने २४ महिन्यात १७३६ युनिटची वीज चोरली. औंढा नागनाथमध्ये फुलाजी आश्रुबा मोहिते यानेही जास्त वीज चोरली

वीज चोरी केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

Electricity theft case

हिंगोली (Electricity theft case) : हिंगोली शहराजवळील अंतुले नगर व औंढा नागनाथ येथे वीज चोरी केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  हिंगोली शहराजवळील अंतुले नगर भागात गणेश मारोतराव कर्‍हाळे याने २४ महिन्याच्या काळात १७३६ युनिटची वीज चोरी केली. महावितरण कंपनीच्या मुल्यांकन कंपनीच्या पत्रकाप्रमाणे ३० हजार ५८० रुपयाचे आर्थिक नुकसान केले व २ हजार रूपये तडजोडीची रक्कम भरणा केला नसल्याने सेनगाव पोलिस ठाण्यात गणेश मारोतराव कर्‍हाळे तसेच औंढा नागनाथ शहरातील नागेश्वर नगरमध्ये फुलाजी आश्रुबा मोहीते याने १८९८ युनिटची २४ महिन्याच्या काळात विज चोरी केली.

महावितरण कंपनीच्या (Electricity theft case) मुल्यांकन पत्रका प्रमाणे ३६ हजार १७३ रुपयाचे आर्थिक नुकसान केले. तसेच तडजोडीचे ४ हजार रुपये भरणा केला नसल्याने सेनगाव पोलिस ठाण्यात महावितरणचे संतोषकुमार गिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलाजी आश्रुबा मोहीते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.