हिंंगोली निवडणुक

हिंंगोलीत राहिलेल्या दोन माजी अधिकार्‍यांची निवडणुकीतून माघार

Hingoli Election:

हिंंगोलीत राहिलेल्या दोन माजी अधिकार्‍यांची निवडणुकीतून माघार

Hingoli Election

हिंगोली (Hingoli Election) : जिल्ह्यात पुर्वी शासकीय सेवेत राहिलेल्या व नंतर राजकारणात गेलेल्या रामदास पाटील सुमठाणकर व साहेबराव कांबळे या दोघांनी घेतलेल्या माघारीची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे. कोरोना काळात हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी राहिलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी बदली झाल्या नंतर शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर झालेल्या लोकसभा व (Hingoli Election) विधानसभा निवडणुकीत त्यांनी हिंगोलीतून उमेदवारी मागितली होती.

उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन सुमठाणकर यांनी हिंगोली विधानसभेची निवडणुक (Hingoli Election) अपक्ष म्हणुन लढविली होती. निवडणुकी नंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. काही दिवस हिंगोलीत राहिल्या नंतर त्यांनी नांदेड जिल्ह्यात बस्तान टाकले. पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. गुरुवारी अचानक त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या राजकीय प्रवासा बद्दल हिंगोलीत चांगलीच चर्चा रंगत आहे.

सुमठाणकर यांच्याप्रमाणेच साहेबराव कांबळे हे सुद्धा हिंगोली जिल्ह्यात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी होते.सेवा निवृत्ती नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन उमरखेड विधान सभेची निवडणुक लढविली होती. ते पक्षातर्फे हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी काँग्रेस पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळविली होती. गुरुवारी अचानक त्यांनी सुद्धा आपली उमेदवारी परत घेऊन महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.

हिंगोली जिल्ह्यातून गेलेल्या या दोन माजी अधिकार्‍यांनी घेतलेली माघार जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे दोघेही काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. दरम्यान, जिल्ह्याचे प्रभारी साहेबराव कांबळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतून (Hingoli Election) माघार घेतल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन नाईक यांनी दिली.

टैग्स: Hingoli Election

संबंधित सामग्री

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

ShivSena Parmeshwar Mandge: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, खासदार नागेश पाटील आष्टीकराला गद्दारीची आरोप करत शिवसेनेच्या विरोधात इशारा देऊन हिंगोलीत गाजावाजा सुरू

Jun 23, 2026
महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाचा हिंगोलीत जल्लोष

महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाचा हिंगोलीत जल्लोष

Mahayuti Saeed Khan: हिंगोलीत सईद खान यांनी महात्मा गांधी चौकात जल्लोष करत महायुतीच्या पदासाठी विजय मिळवला. परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकात त्यांचे विजय सांगितले.

Jun 22, 2026
27 जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंगोलीत

27 जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंगोलीत

Uddhav Thackeray: शिवसेनेची उद्धव ठाकरे हिंगोलीत रात्र 8 वाजता परभणीला पोहोचणाऱ्या कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी सांधळ्या 10.30 वाजून सुरुवात करत असतील.

Jun 21, 2026
हिंगोली जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात

हिंगोली जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात

Hingoli SIR Mission: भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण (ESAR) प्रक्रियेचे काम सुरू होते. जिल्हातील एकूण ९ लाख ६१ हजार ३४५ मतदार

Jun 19, 2026
शिवसेनेचे मतदार एकसंघ; आघाडी गेली पिछाडीवर

शिवसेनेचे मतदार एकसंघ; आघाडी गेली पिछाडीवर

Hingoli Shiv Sena Election: हिंगोलीतील मतदात्यांच्या एकसंघित मतभागामुळे शिवसेनाचा उमेदवार पाठाला लागला असून अपक्ष उमेदवारी सुशिल देशमुख यांनी अंतिम फेरीत आघाडीच्या स्थानाने जिंकले.

Jun 18, 2026