शेतकरी E-KYC

हिंगोलीतील शेतकऱ्यांसाठी 13 आणि 14 ऑगस्टला E-KYC बंधनकारक

Farmer E-KYC: हिंगोली जिल्ह्यातील शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारच्या सांगितल्या तारीखीमध्ये बँकरात उपस्थित असून ई-केवायसी पूर्ण करावे लागेल.

हिंगोलीतील शेतकऱ्यांसाठी 13 आणि 14 ऑगस्टला E-KYC बंधनकारक

Farmer E-KYC

 

आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालकांना बँकेत उपस्थित राहून ई- केवायसी करून घ्यावी लागणार

हिंगोली (Farmer E-KYC) : जिल्ह्यातील शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली यांनी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले E-KYC बँक शाखेच्या स्तरावर पूर्ण करणे आवश्यक आहे. 

जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 ते 14 ऑगस्ट  या दोन दिवसांत शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी हिंगोली, कळमनुरी, डोंगरकडा आणि आखाडा बाळापूर येथील विविध बँक शाखांवर आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंगोली येथील बँक ऑफ बडोदा शाखेसाठी संजय नारायणराव बोंगर 9850322167, युनियन बँक ऑफ इंडिया साठी रामदास किशनराव बोंगर 9881275393 आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ADB साठी मुकुंद मुंजाजी कदम 8999987875 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हिंगोली येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी श्री. शिवाजी तातेराव जाधव 8888906400 हे उपलब्ध राहणार आहेत. 

कळमनुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियासाठी नाईक शेख नजिब शेख मुजीब 9975897526 आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी  बाळासाहेब प्रज्ञात सातव 8275107800, डोंगरकडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियासाठी सुभाष अडकिणे 9665582517 तर आखाडा बाळापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियासाठी नारायण गंगाधर करंडे 95445586919 हे संचालक 13 आणि 14 तारखेला बँकेत उपस्थित राहून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून E-KYC पूर्ण करून देणार आहेत.

या संदर्भात जिल्हा प्रकल्प प्रमुख महाआयटी हिंगोली गंगाधर लोंढे यांनाही आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालकांना सूचना देण्याबाबत कळवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी हिंगोली यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी विहित तारखेला आपल्या संबंधित बँक शाखेत जाऊन E-KYC पूर्ण करावे. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास शासकीय योजनांच्या लाभात अडचण येऊ शकते.

संबंधित सामग्री

आता...स्मार्ट मीटरला आधार जोडणी अनिवार्य

आता...स्मार्ट मीटरला आधार जोडणी अनिवार्य

Smart meter: सीएसपीडीसीएल स्मार्ट मीटरची ई-केवायसी करणार आहे. सर्व ग्राहकांना आधारशी जोडले जाणार आहे. चेहरा ओळख आणि आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी

Aug 09, 2026
लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का: 80 लाख महिला अपात्र; पात्रांवर अन्याय नाही – फडणवीसांचे स्पष्टीकरण

लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का: 80 लाख महिला अपात्र; पात्रांवर अन्याय नाही – फडणवीसांचे स्पष्टीकरण

राज्यातील चर्चेत असलेल्या *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने*मध्ये मोठी घडामोड समोर आली आहे.

Jun 02, 2026