हिंगोली जिल्हा दुष्काळ

जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर वाळलेल्या सोयाबीनची होळी; दुष्काळ जाहिर करण्याची मागणी

Hingoli District Drought: पावसाने मोठी दडी मारल्याने हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, हळद, उडीद, मूग व इतर खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक भागात पिके वाळून करपत असून शेतकरी आर्थिक संकटात

जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर वाळलेल्या सोयाबीनची होळी; दुष्काळ जाहिर करण्याची मागणी

Hingoli District Drought

 

शासनाच्या विरोधात संतापाची लाट

हिंगोली (Hingoli District Drought) : यावर्षी पावसाने मोठी दडी मारल्याने हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, हळद, उडीद, मूग व इतर खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक भागात पिके वाळून करपत असून शेतकरी आर्थिक संकटात आहे. याचाच निषेध म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व शेतकर्‍यांनी जिल्हा कृषी कार्यालयाच्या गेटसमोर वाळलेले सोयाबीन आणून त्याची होळी करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

जून महिन्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकांना चांगली सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकर्‍यांनी पेरणी, बियाणे, खते, औषधे व मशागतीवर मोठा खर्च केला असून आता हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे. जिल्ह्यात २ लाख ६५ हजार शेतकर्‍यांनी १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी प्Dइण्- ERउध् कंपनीकडे पीक विमा भरला आहे. मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी किंवा कृषी अधिकारी बांधावर पाहणीसाठी आला नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने बांधावर जाऊन पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी हिंगोली जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, सर्व खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि पिक कर्जाचे तात्काळ वाटप करावे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास मंत्रालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव लक्ष्मणराव पतंगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण रामकृष्ण मते, अशोकराव जयस्वाल, विशाल पोळ, रमेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026