हिंगोली डिझेल टंचाई

हिंगोलीत इंधनपुरवठा मुबलक असल्याचा दावा,मात्र रांगा होईनात कमी

Hingoli Diesel Shortage: हिंगोलीत शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंपावर लांब रांगे असून ट्रॅक्टरसाठी पेट्रोल मिळविण्यासाठी कॅनमध्ये डिझेल घेण्याचे प्रचलन आहे.

हिंगोलीत इंधनपुरवठा मुबलक असल्याचा दावा,मात्र रांगा होईनात कमी

Hingoli Diesel Shortage

हिंगोली (Hingoli Diesel Shortage) : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डिझेल टंचाई निर्माण झाली आहे सर्वच पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. इंधनपुरवठा मुबलक असल्याचा दावा केला जात आहे मात्र रांगा काही कमी होत नसल्याचे चित्र आहे.शहरातील चौधरी व नाईक पेट्रोल पंपावर डिझेलसाठी २५ मे सोमवार रोजी लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर पोलीस पेट्रोल पंप बंदच होता.

 जिल्ह्यात  सध्या खरिपाच्या पेरणीकरिता शेतीची हंगामपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. पशुधन कमी झाल्याने बहुतेक शेतीकामे ट्रॅक्टर व इतर यंत्राच्या साह्याने करावी लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धते बाबत नागरिकांमध्ये चर्चा आणि चिंता निर्माण .झाली असून शहरातील चौधरी पेट्रोल पंप, नाईक पेट्रोल पंपावर  शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरच्या व इतर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

दरम्यान, ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर (Hingoli Diesel Shortage) आणण्याकरिता पाच दहा लिटर पेट्रोल लागत असल्याने अनेक शेतकरी प्लास्टिक कॅनमध्ये डिझेल घेऊन जात असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासूून डिझेल टंचाई निर्माण  झाली  आहे. सद्य स्थितीत शेतकर्‍यांची  पेरणीपुर्व  मशागतीच्या कामाची लगबग सुरु असल्याने सर्व कामे ट्रॅक्टरवरच अवलंबून आहेत. यामुळे ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळविण्यासाठा.शेतकर्‍यांना पेट्रोल पंपावरच वेळ द्यावा लागत आहे.   रात्री-बेरात्री सुध्दा  रांगेमध्ये उभे राहण्याची वेळ  शेतकर्‍यावर आली आहे. डिझेल मिळत नसल्याने मशागतीचे कामे खोळंबली  आहेत. मशागतीचे कामे कधी  होणार याकडे आता शेतकर्‍याचे लक्ष लागलीे  आहे. प्रशासनाने डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जात  आहे.

हिंगोलीत दोन  पंपावर लांबच लांब रांगा

शहरातील चौधरी  पेट्रोल पंप व नाईक पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरसह इतरही  वाहनाच्या  लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर शहरातील पोलिस पेट्रोल पंप मात्र बंद आहे. पंप बंद असल्याने शहरात सुरु असलेल्या  दोन पंपावर सकाळी भल्या  पहाटेपासून शेतकरी डिझेल घेण्यासाठी  ट्रॅक्टर घेवून आल्याने पंपाच्या समोर  मोठी गर्दी  झाली.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026