राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी चौकशीची मागणी
हिंगोली (Hingoli Congress Satyagraha) : अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी आलेल्या देणगीतील अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ हिंगोली शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी "रघुपती राघव राजाराम" सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. १० जुलै रोजी शहरातील गांधी चौकातील घडवाई हनुमान मंदिरात हनुमान महाराजांचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मंदिर परिसरात कार्यकर्ते टाळ-मृदूंगासह बसून "रघुपती राघव राजाराम" भजन करत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जयघोष करत होते.
दर्शनानंतर घडवाई हनुमान मंदिरापासून गांधी चौक मार्गे हिंगोली शहर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी (Hingoli Congress Satyagraha) रामभक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीत पारदर्शकता असावी आणि संपूर्ण हिशोब जनतेसमोर यावा अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन हिंगोली शहर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
या (Hingoli Congress Satyagraha) सत्याग्रहात जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशआप्पा सराफ, शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, प्रदेश सचिव प्रा. साहेबराव देवकते, माजी जि.प. सदस्य प्राचार्य श्यामराव जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बंटी नागरे, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, औंढा तालुका अध्यक्ष ॲड. प्रदीप पोले, सेवादल जिल्हाध्यक्ष सुदामराव खंदारे यांच्यासह बापुराव पाटील वडदकर, बाजीराव इंगोले, जुबेर मामु, एकनाथ शिंदे, अतुल नायक, किसनराव जुमडे, दत्तराव राठोड, विठ्ठल जाधव, हारुण पठाण, विठ्ठल मोहनकर, अनुप नायक, युसूफ पठाण, संजय राठोड, शेख अमन, सुमित शिंदे, त्र्यंबक जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.