मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतरच्या कथित शुद्धीकरणाच्या निषेधार्थ आयोजन
हिंगोली (Hingoli Congress Protest) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या कथित शुद्धीकरणाचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता हिंगोली येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, हिंगोली येथून सुरू होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे.
या मोर्चात प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI तसेच काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा असेही सांगण्यात आले आहे.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, हिंगोली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मिलिंद उबाळे आणि प्रदेश सचिव युवक काँग्रेस बंटी नागरे यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.