सीईओ विवेक गायकवाड

हिंगोली सीईओ विवेक गायकवाड यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्याकडून सत्कार

CEO Vivek Gaikwad: हिंगोलीचे सीईओ विवेक गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा कामगिरीसाठी सेवाकर्मी पुरस्कार प्राप्त झाला, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्कार केला.

हिंगोली सीईओ  विवेक गायकवाड  यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्याकडून सत्कार

CEO Vivek Gaikwad

हिंगोली (CEO Vivek Gaikwad) : हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना शासनाचा उत्कृष्ठ सेवाकर्मी पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमवारी ता ३० जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.

राज्य शासनाच्या 150 दिवस कार्यक्रमात उत्कृष्ट  कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस  यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड (CEO Vivek Gaikwad) यांना शनिवारी मुंबई येथे विशेष कार्यक्रमात  सेवाकर्मी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिंगोली सारख्या लहान जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.

त्यानंतर आज हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड (CEO Vivek Gaikwad) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त सीईओ डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, संदीप सोनटक्के, राजू नरवाडे, ठोंबरे, केंद्रे, पी. व्ही. घंटाराम, प्रफुल्ल खंदारे, विवेक दळवी, सिद्दीकी, नंदकिशोर परिहार, संदीप अन्नदाते, अनिकेत सोनटके, गिरीराज बोथीकर, उदय देशपांडे, सुरेखा  जारवाल, एम. डी. पवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड (CEO Vivek Gaikwad) यांनी मार्गदर्शन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच जिल्हा परिषदेला यश मिळविता आले आहे. यापुढेही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करून जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक गतिमान करावे असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींची तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी विभागांना दिल्या.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026