शहरातून जडवाहनांची वाहतूक सुरू; बायपास रस्त्याची मागणी तीव्र! 

मानोरा शहरातून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरातून जडवाहनांची वाहतूक सुरू; बायपास रस्त्याची मागणी तीव्र! 

Heavy Vehicles

रस्ता ओलांडताना नागरिकांमध्ये भिती!

मानोरा (Heavy Vehicles) : तालुक्याचे ठिकाण मानोरा शहरातून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रक, ट्रॅक्टर, डंपर यासारख्या जड वाहनांमुळे गावातील मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.  

गावातील रस्ते अरुंद असल्यामुळे जड वाहनांची सततची वर्दळ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच धूळ, आवाज आणि अपघाताचा धोका यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातून होणारी ही जड वाहतूक थांबवून गावाबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वडगाव येथून बायपास रस्त्याच्या मागणीसाठी माजी पंचायत समिती उप सभापती उज्ज्वला राजेंद्र गावंडे यांनी गत एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ यांना पत्र दिले होते. परंतु, सा. बां. विभाग यांनी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.  या समस्येमुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बायपास रस्ता तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. बायपास रस्ता झाल्यास गावातील वाहतूक सुरळीत होऊन अपघाताची शक्यता कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  शहराच्या बाहेरून बाय पास रस्ता तयार झाल्यास जड वाहनाची ये - जा करण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत होईल.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026