हट्टा पेट्रोल टंचाई

हट्टा येथील भारत पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहनांच्या किलोमीटरभर रांगा  

Hatta petrol shortage: हट्टा येथील महाविद्यालयासमोरील भारत पेट्रोल पंपावर तीन दिवसानंतर डिझेलचा पुरवठा झाल्याने वाहनधारकांनी व कॅन घेऊन आलेल्या ग्राहकांनी मोठी गर्दी केली.

हट्टा येथील भारत पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहनांच्या किलोमीटरभर रांगा  

Hatta petrol shortage

हट्टा (Hatta petrol shortage) : हट्टा येथील महाविद्यालयासमोरील भारत पेट्रोल पंपावर तीन दिवसानंतर डिझेलचा पुरवठा झाल्याने वाहनधारकांनी व कॅन घेऊन आलेल्या ग्राहकांनी मोठी गर्दी केली. डिझेल मिळण्यासाठी सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  

सलग तीन दिवस डिझेल उपलब्ध नसल्याने ट्रॅक्टर, मालवाहू वाहने व शेतीकामासाठी लागणारे डिझेल मिळत नव्हते. आज पुरवठा सुरू होताच परिसरातील शेतकरी व वाहनचालकांनी पंपावर धाव घेतली. दुपारपर्यंत या रांगा मुख्य रस्त्यावर सुमारे एक किलोमीटरपर्यंत पोहोचल्या होत्या. कॅनमध्ये डिझेल भरणाऱ्यांचीही मोठी संख्या दिसून आली.  

रस्त्यावर लागलेल्या रांगांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने इंधनाचा नियमित पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पंप व्यवस्थापनाने सांगितले की, पुरवठा उशिरा झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असून सध्या डिझेलचा साठा पुरेसा आहे.

टैग्स: Hatta petrol shortage