हट्टा रास्तारोको आंदोलन

मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हट्टा बंद; रास्तारोकोला प्रतिसाद 

Hatta Rastaroko Andolan: वसमत तालुक्यातील हट्टा येथे संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या अंतरवली,सराटी येथील उपोषणाच्या समर्थनार्थ ४ सप्टेंबर शुक्रवार रोजी कडकडीत बंद पाळुन रास्ता रोको

मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हट्टा बंद; रास्तारोकोला प्रतिसाद 

Hatta Rastaroko Andolan

हट्टा (Hatta Rastaroko Andolan) : वसमत तालुक्यातील हट्टा येथे संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या अंतरवली,सराटी येथील उपोषणाच्या समर्थनार्थ ४ सप्टेंबर शुक्रवार रोजी कडकडीत बंद पाळुन रास्ता रोको (Hatta Rastaroko Andolan) करण्यात आला, याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळी १० वाजता सकल मराठा समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून बसस्थानका पर्यंत घोषणाबाजी करत येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पुष्पक देशमूख, किरण देशमूख,  जाधव सोन्नेकर यांनी मार्गदर्शन केले. (Hatta Rastaroko Andolan) रास्ता रोको दरम्यान, गोविंद देशमूख,  माधव चट्टे,  सुभाष देशमुख, हर्षल देशमूख, अर्जुन  चट्टे, ज्ञानेश्वर चट्टे, श्याम रोकडे, पंडीत देशमूख बबलू भवर, चेतन देशमूख,  भूभम कदम , मुकुंद देशमूख आदी सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप  बोरकर, आडे , इमरान कादरी, ताम्रध्वज कासले,  युवराज गवळी,  कृष्णा चव्हाण, किरण धोतरे, बाबर शेख, सिरसेवाड, सांगळे, चव्हाण, शेख अन्वर आदींनी बंदोबस्त ठेवला होता.

टैग्स: Hatta Rastaroko Andolan