उष्णकटिबंधीय आग शेतातील ऊस नाश करी

शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला; तीन लाखांहून अधिक नुकसान

गंगाखेड तालुक्यातील ईसाद शिवार शेतात शॉर्ट सर्किटमुळे ४ एकरावरील उभा ऊस आगाने नाश झाले. कमलबाई नारायण लोखंडे यांच्या शेतातील वातावरणामध्ये जळणे अघोळल्याने आग झाली. आगाने ४ तेरेआडीच तीन एकरावरील ऊस नाश झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक लाखांहून अधिक नुकसान झाले. पोलिसांचे तपास होत आहे

शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला; तीन लाखांहून अधिक नुकसान

 

गंगाखेड तालुक्यातील ईसाद शिवारातील घटना; अडीच ते तीन एकरांवरील उभा ऊस जळाला

गंगाखेड : शेतातील विद्युत रोहित्रामध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या उडून उभ्या उसाला आग लागल्याची घटना शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता गंगाखेड तालुक्यातील ईसाद शिवारात घडली. या आगीत अडीच ते तीन एकर क्षेत्रावरील उभा ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्यांचे अंदाजे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईसाद येथील शेतकरी कमलबाई नारायण लोखंडे, शिवसांब नारायण लोखंडे आणि भीमाशंकर नारायण लोखंडे यांच्या शेतातील विद्युत रोहित्रामध्ये दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाले. त्यातून ठिणग्या उडाल्याने शेतातील उसाला अचानक आग लागली.

शेतालगत असलेल्या वामनराव सातपुते यांनी आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली. माहिती मिळताच कमलबाई लोखंडे, शिवसांब लोखंडे आणि भीमाशंकर लोखंडे यांनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनीही मदतीसाठी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

वामनराव सातपुते, पिराजी हाके, हरिओम सातपुते, मन्मथ सोनटक्के, राम सातपुते, रमेश पवार, रामराव सोनटक्के, शिवराज चिंचोलकर, शंकर सोनटक्के, सिद्धू जमदाडे, भीमराव माकोडे, संजय पवार, माऊली भोसले, जयपाल राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी शेतातील मोटारी सुरू करून तब्बल अर्धा ते पाऊण तास अथक प्रयत्न केले. अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यापूर्वीच त्यांनी आग आटोक्यात आणली.

मात्र, तोपर्यंत अडीच ते तीन एकर क्षेत्रावरील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. या घटनेत तीन लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गंगाखेड पोलिसांत अकस्मात जळीताची नोंद

या घटनेप्रकरणी कमलबाई नारायण लोखंडे (वय ६०, रा. ईसाद, ता. गंगाखेड) यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दुधाटे करीत आहेत.

पावसाचा खंड अन् आता पिकाचे नुकसान; शेतकरी पुन्हा संकटात

भर पावसाळ्यात महिनाभरापेक्षा अधिक काळ पावसाने दडी मारल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहेत. पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असतानाच आता शॉर्ट सर्किटमुळे उभा ऊस जळाल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे.

एकीकडे पावसाची प्रतीक्षा आणि दुसरीकडे हातातोंडाशी आलेले पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने संबंधित शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शासनाने या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा आणि संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.