गोल्डन मेलोडिज ऑफ बॉलिवूड

‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ची सुरेल मैफल; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Golden Melodies of Bollywood: 'गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड' हिंदी चित्रपटांचे सदाबहार गीत संकल्पना असलेल्या आयोजनात रसिक प्रेक्षकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.

‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ची सुरेल मैफल; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Golden Melodies of Bollywood

नागपूर (Golden Melodies of Bollywood) : संगीतप्रेमी रसिकांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ ही विशेष संगीत मैफल नुकतीच लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात संपन्न झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार आणि लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने सभागृहातील वातावरण सुरेल झाले. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी सेलिब्रिटी शेफ विष्णु मनोहर आणि दिग्दर्शक राजेश समर्थ प्रामुख्याने उपस्थित होते. अमित अंधारे, मनश्री जोशी, गिरीश बडे, ज्योती बनकर, आनंद गायधनी, नीलिमा उराडे, साक्षी त्यागी आणि धीरज पारपल्लीवार यांनी आपल्या सुरेल आवाजात विविध लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांचे सादरीकरण केले. त्यांच्या गायनाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. धनश्री सेवलकर झा यांनी केले. गोल्डन स्ट्रिंग्स म्युझिकल ग्रुपच्या वतीने आयोजित या (Golden Melodies of Bollywood) मैफलीचे आयोजन अमित अंधारे यांनी केले होते. जुन्या हिंदी चित्रपटांतील अजरामर गीतांनी रसिकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

विनामूल्य प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित राहिले. कलाकारांच्या सादरीकरणाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ची मैफल संस्मरणीय ठरली.

संबंधित सामग्री

नागपुरात रंगणार ‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ संगीत मैफल

नागपुरात रंगणार ‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ संगीत मैफल

Golden Melodies of Bollywood: संगीतप्रेमी रसिकांसाठी नागपुरात हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गीतांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली आहे. ‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन

Aug 11, 2026