गॅस टंचाईच्या उपायात रॉकेल वितरण

भारतामध्ये गॅस टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर रॉकेलचे वितरण सुरू

युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस टंचाई निर्माण झाल्याने, खासदार रामराव वडकुते यांनी पेट्रोल पंपांवर रॉकेल वितरणाची घोषणा केली.

भारतामध्ये गॅस टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर रॉकेलचे वितरण सुरू

खासदार रामराव वडकुते यांचे नागरिकांना आवाहन

​हिंगोली : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांची चूल पेटती राहावी यासाठी मोठा निर्णय घेतला असून, नवनिर्वाचित राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी यासंदर्भात जनतेला महत्त्वाची माहिती दिली आहे.

​जागतिक युद्धाचा परिणाम: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इराणकडून होणारा एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी देशामध्ये गॅसची काही प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.

​केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सर्वसामान्यांना गॅस टंचाईची अडचण होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने प्रत्येक पेट्रोल पंपावर २,५०० लिटर रॉकेल (घासलेट) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

​नियोजन व अंमलबजावणी यासाठी केंद्र सरकारने नुकतेच परिपत्रक जाहीर केले असून, सर्व पेट्रोल पंपांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. पंपांवर विशेष 'शेड' उभे करून या रॉकेलचे वितरण केले जाणार आहे.

​जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केंद्र आणि राज्य सरकारने इंधन पुरवठ्याचे योग्य नियोजन केले आहे. सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार रामराव वडकुते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

​जागतिक घडामोडींमुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने रॉकेल वितरणाची व्यवस्था केली आहे. कुठल्याही नागरिकाची गैरसोय होऊ नये हाच सरकारचा उद्देश आहे.

राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. गॅस सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत रॉकेल हा एक उत्तम पर्याय म्हणून नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Oct 06, 2026