वसमत शहरातील मिरवणूक मार्ग झालाय लाललाल
वसमत (Ganesh Visarjan Procession) : गणरायाला निरोप देताना वसमत शहरात यावर्षी डिजे, ढोल-ताशांचा गजर, यांच्यासह गुलालाची प्रचंड उधळण झाली शेकडो पोते गुलाल मिरवणुकीत उधळण्यात आला. त्यामुळे गुलालाचा महापूर आल्यासारखे वातावरण होते मिरवणूक होऊन दोन दिवस उलटले तरी रस्त्यावरील गुलालाचा थर कायमच आहे मिरवणूक मार्ग लाली लाल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
गणपती बाप्पाच्या जयघोषासोबत यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेली गुलालाची प्रचंड उधळण चर्चेचा विषय ठरली आहे. मिरवणूक संपल्यानंतरही शहरातील रस्त्यांवर गुलालच गुलाल दिसत आहे रस्ते लाललाल झालेले आहेत एवढा प्रचंड गुलाल मिरवणूक मध्ये पहिल्यांदाच उधळताना पहावयास मिळाला आहे गणेश विसर्जन मिरवणूक प्रचंड उत्साहात पुढे सरकत होती आणि मागे राहात होता तो गुलालाचा लाल ठसा! हवेत उडणारा गुलाल, वाहनांवर साचलेला गुलाल आणि रस्त्यावर पसरलेला गुलाल... मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर गुलालाचे थर अजूनही साचून आहेत.
‘इतका गुलाल यापूर्वी कधी पाहिला नाही!’ अशी चर्चा मिरवणुकीनंतर नागरिकांमध्ये रंगली होती. गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तीचा जल्लोष मिरवणुकीतील उत्साह शिगेला पोहोचला होता तरुणाई डीजे च्या ढोल ताशाच्या तालावर धुंद होऊन गणरायांचा जयजयकार करत नाचत होती मिरवणूक संपली, गणरायाला निरोप मिळाला; मात्र रस्त्यांवर अजूनही गुलालाचा ‘लाल उत्सव’ सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर नजर टाकली असता सर्वत्र लालच लाल रंग दिसत असून, रस्त्यांवरील गुलालाचे साठे मिरवणुकीच्या भव्यतेपेक्षा गुलालाच्या उधळणीचीच चर्चा अधिक रंगवत आहेत.
गणराय गेले... ढोल-ताशे थांबले... मिरवणूकही संपली; पण वसमतच्या रस्त्यांवर उरला तो गुलालच गुलाल!
यंदा गणरायाला निरोप देताना गुलालाच्या महापूर आल्यासारखी अवस्था होती
डी जे चा दणका व गुलालाची उधळण
वसमत मध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे चा दणका होता सोबतच पारंपारिक वाद्य ढोल ताशे यांचा गजरही होता तरुणाई प्रचंड उत्साहात होती त्याच सोबत कधी नव्हे तो एवढा प्रचंड प्रमाणात गुलाल मिरवणुकीत उधळताना पहावयास मिळाला मिरवणुकीत प्रत्येक जण गुलालाने न्हाऊन निघाला होता शेकडो पोते गुलालाची उधळण मिरवणुकीच्या निमित्ताने झाली गुलालाच्या उधळण किती प्रचंड प्रमाणात झाली हे शहरातील रस्त्याचा बदललेला रंग पाहता लक्षात येते मिरवणूक होऊन दोन दिवस उलटले तरी अजूनही रस्त्यावरील गुलालाचा थर कायमच आहेत यावर्षी वसमत मध्ये गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडली.