Gambling Raid

कळमनुरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 1.49 लाखांचा मुद्देमाल जप्त

कळमनुरी पोलिसांनी शहराजवळील बायपास परिसरातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून 10 जणांविरुद्ध कारवाई केली.

कळमनुरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 1.49 लाखांचा मुद्देमाल जप्त

Gambling Raid

कळमनुरी : कळमनुरी पोलिसांनी शहराजवळील बायपास परिसरातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून 10 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, दोन मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 49 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हिंगोली-नांदेड रोडवरील कळमनुरी बायपास परिसरात बबन शिंदे यांच्या शेतातील टिनपत्राच्या शेडमध्ये काही जण 'झन्ना-मन्ना' नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत शेख मोबीन, जफ्फर खाँ, शेख आवेश, जुनेदखाँन, शिवाजी गाभणे, श्याम माखाणे, अंबादास सातव, डिंगाबर जावळे, श्याम सोळंके आणि अमोल ठाकूर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

आरोपींकडून रोख रक्कम, 52 पत्ते, एक स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, एक विना नंबरची एचएफ डिलक्स मोटारसायकल असा एकूण 1,49,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस स्टेशन कळमनुरी येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप पोळे करीत आहेत.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026